जनजाती सुरक्षा मंचचा डी लिस्टींग महामेळावा
नागपूर येथे २१ नोव्हे रोजी होत असणाऱ्या डीलिस्टग महामेळाव्यासाठी अकोट उपविभागातील तेल्हारा व अकोट तालुक्यातुन ४५ वाहनांमधुन २ हजार आदिवासी बांधव सोमवारी रवाना झाले.आरंभ आॕर्गनायझेशनचे कॅप्टन सुनील डोबाळे व विदर्भ वनवासी कल्याण आश्रम एकलव्य छात्रवाच पदाधिकारी व एकलव्य एकल विद्यालयाचे पर्यवेक्षक व शिक्षक व पदाधिकारी अजाबराव भास्कर,
अनिलजी भारसाकळे, सदाशिव भारसाकळे अजयजी तायडे, देवानंद मोरे, पवन ठाकरे,जनजाती सुरक्षा मंचाच्या जिल्हा संयोजक नथू केदार,तुषार अढाऊ,विशाल राठौर, निलेशजी चंदन, कमलेशजी राठी तसेच कल्याण आश्रमचे पूर्णवेळ कार्यकर्ता यांनी झेंडा दाखवून त्यांच्या मेळाव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जनजाती सुरक्षा मंचचा डी लिस्टींग महामेळा द्वारे धर्मांतरीत व्यक्तींना अनुसुचित जातीतुन वगळण्या यावे अशी मागणी करण्यात येत आहे. मेळाव्यासाठी पोपटखेड मार्गावरील आदिवासी एकलव्य छात्रवास येथे उपविभागातील सर्व गावांमधून आलेल्या आदिवासी बांधव यांनी एकत्र होऊन रात्री अकरा वाजता नागपूरसाठी विविध वाहनातुन प्रस्थान केले.