2000 Notes : चलनातून बाद झालेल्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची आणि जमा करण्याची अंतिम तारीख आज 30 सप्टेंबर होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ती पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या ₹3.56 लाख कोटी ₹2000 च्या नोटांपैकी ₹3.42 लाख कोटी रुपयांच्या नोटा बॅंकांमध्ये परत आल्या आहेत. 29 सप्टेंबर रोजी व्यवसाय बंद झाल्यानंतर केवळ 0.14 लाख कोटी रुपयेच चलनात राहिले. अशा प्रकारे, 19 मे 2023 रोजी चलनातून बाद असलेल्या ₹2000 च्या 96% नोटा आता बँकांमध्ये परत आल्या आहेत.
RBI ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 8 ऑक्टोबर 2023 पासून बँक शाखांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा जमा करणे आणि बदलणे बंद केले जाईल. त्यापूर्वी 7 ऑक्टोबरपर्यंत नोटा जमा कराव्यात. 8 ऑक्टोबरनंतर, RBI च्या 19 इश्यू ऑफिसमध्ये 20,000 रुपयांपर्यंतच्या 2,000 रुपयांच्या नोटा एकावेळी बदलल्या जाऊ शकतात.
8 ऑक्टोबरनंतर, उर्वरित 2,000 रुपयांच्या नोटा फक्त आरबीआयच्या 19 इश्यू ऑफिसमधून तुमच्या खात्यात जमा केल्या जाऊ शकतात. लोक टपाल विभागाकडून आरबीआयच्या 19 इश्यू ऑफिसमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा पाठवू शकतात. या नोटेचे मूल्य संबंधित व्यक्तीच्या खात्यात जमा केले जाईल.
आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की 7 ऑक्टोबरनंतरही 2000 रुपयांच्या नोटा वैध राहतील. न्यायालये, कायद्याची अंमलबजावणी करणार्या संस्था, सरकारी विभाग किंवा सार्वजनिक अधिकारी 2000 रुपयांच्या नोटा RBI च्या 19 इश्यू ऑफिसमध्ये कोणत्याही मर्यादेशिवाय जमा करू शकतील आणि तपास किंवा कार्यवाही दरम्यान आवश्यक असेल.
The RBI extended the last date to deposit Rs 2,000 notes to October 7.
— IndiaToday (@IndiaToday) September 30, 2023
Read more: https://t.co/zpq6SHs0yD#RBI #2000Notes #Currency #India pic.twitter.com/PqI1qcqszq