सांगली – ज्योती मोरे.
सांगली विधानसभा मतदारसंघातील पदमाळे या गावी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या फंडातून करण्यात येणाऱ्या वीस लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळेस सुधीर गाडगीळ यांनी केलेल्या कामाबद्दल गावकऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पदमाळे गावचे माजी सरपंच सचिन जगदाळे यांनी सुधीर दादांच्या कामाबद्दल कौतुक केले व दादांना इथून पुढेही विकास कामासाठी निधी मिळावा ही विनंती केली. गावातील तरुण युवकांनी खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून देण्याची ही विनंती दादांना केली नूतन ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जगदाळे यांनी दर्गा,हनुमान मंदिर लक्ष्मी मंदिर व नदीकडे जाणारा रस्ता तसेच गावातील इतर कामांसाठी निधी मागितला.
सुधीर दादांनी विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द दिला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जगदाळे माजी ग्रामपंचायत सदस्य जयसिंग (बंडू) गुरव, शरद भाऊ पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील शिंदे, रमेश जगदाळे, दिलीप कदम, अशोक जगदाळे, राजेंद्र मोहिते, बाळासो शिंदे, रोहित सावंत, प्रदीप मोरे, निलेश यादव, समीर जगदाळे, साहील मुलाणी ,अमित सुतार, सचिन चौगुले, वैभव कोळी, संतोष चव्हाण, अमित मदने व इतर मान्यवर उपस्थित होते.