अमरावती ग्रामीण जिल्हयात पोलीस स्टेशन अंजनगाव शहरात दिनांक ०४ / १२ / २०२२ चे मध्यरात्री लखाड रोड, अंजनगाव येथे असलेल्या मो. फारुख यांच्या गोडावून मध्ये रात्री दरम्यान अज्ञात दरोडेखोरांनी दराडा टाकुन मो. फारुख व चौकीदार यास मारहाण करुन रोख रक्कम अंदाजे चार लाख रु. जबरीने लुटुन नेली होती. वरुन पोलीस स्टेशन अंजनगाव येथे अप.क्र. ६९७/२०२२ कलम ३९५, ३९७ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी सदर गुन्हा उघड करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे अंजनगाव यांना सुचना निर्गमीत होत्या. वरुन स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील चार पथक व पोस्टे अंजनगाव येथील एक पथक संयुक्तिकरीत्या सदर गुन्हाचा तपास करीत असतांना दि.०६/१२/२०२२ रोजी सदर गुन्हयात यापुर्वीच आरोपी नामे १) उबेद खा शफि खा, वय ३४ वर्ष रा. भालदारपुरा, अंजनगाव २) आतिफ नियाज अब्दुल मुनाफ, वय २९ रा. डब्बीपुरा, अंजनगाव यांना अटक करण्यात आली असुन सदर गुन्हा हा त्यांनी त्यांचे इतर बाहेरील जिल्हयातील ६ साथीदारांसह केल्याची कबुली दिली होती.
करिता यातील फरार इतर आरोपीच्या मागावर असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने यातील फरार ६ आरोपीतांपैकी आरोपी नामे १) शंकर फुलचंद भदोरीया, वय ३५ वर्षे २) अहमद बाबु तडवी पठाण, वय ५० वर्षे, दोन्ही रा. खंडवा (म.प्र), ह.मु. चोहट्टा बाजार, अकोला यांना आज दि.०८/१२/२०२२ रोजी अटक केली असुन इतर फरार आरोपीतांना सुध्दा लवकरच अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अटक आरोपीतांना पुढील कार्यवाही करिता पो.स्टे. अजंनगांव यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, श्री अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक, श्री शशिकांत सातव, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री तपन कोल्हे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखाचे पोउपनि सुरज सुसतकर, नितीन चुलपार, व अंमलदार संतोष मुंदाने, सुनिल महात्मे, बळवंत दाभणे, सचिन मिश्रा, रवि बावणे, अजमत, पंकज फाटे, अमोल केन्द्रे चालक राजेश सरकटे व सायबर सेल यांनी केली.