Monday, December 23, 2024
Homeराज्य"गणराजा"च्या साक्षीने १८९ जणांनी केले रक्तदान...

“गणराजा”च्या साक्षीने १८९ जणांनी केले रक्तदान…

मुंबई – गणेश तळेकर

बालगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ “अभ्युदय नगरचा गणराज” आणि के. ई. एम. रुग्णालय यांच्या सहयोगाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत गणराज सभागृह, अभ्युदय नगर, काळाचौकी येथे आयोजित करण्यात आले होते.

रक्तदान शिबिरामध्ये १८९ रक्तदात्यांनी यशस्वीरीत्या रक्तदान करुन शिबीर यशस्वी होण्यासाठी बहुमूल्य सहकार्य केले. रक्तदान शिबीर आयोजनाचे यंदाचे मंडळाचे ६ वे वर्ष होते. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना (उबाठा) आमदार आणि विधीमंडळ गटनेते अजय चौधरी, माजी नगरसेवक दत्ता पोंगडे, अनिल कोकीळ, सचिन पडवळ शिवसेना शिवडी विधानसभा संघटक सुधीर भाऊ साळवी, शिवसेना शाखाप्रमुख मिनार नाटाळकर तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष नंदकुमार चिले, शाखाध्यक्ष राजेश मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवडी विधानसभा अध्यक्ष विजय झांजुरे, जिल्हा उपाध्यक्ष राम बोडके, सरचिटणीस चंद्रकांत भोगले, वॉर्ड अध्यक्ष वसंत यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संतोष आमडोस्कर, सरचिटणीस शैलेश सकपाळ, खजिनदार गोविंद नाईक, कार्याध्यक्ष निखिल मांडे आणि विश्वस्त मंगेश नागांवकर, मोहन मांडे, मनिष साळकर, संतोष पाताडे, नरेश जाधव आणि उपपदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अविरत परिश्रम घेतले.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: