Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Today१८ चाकी ट्रक अडकला रेल्वे फाटकावर...तेवढ्यात आली ट्रेन...घटना CCTV मध्ये कैद...

१८ चाकी ट्रक अडकला रेल्वे फाटकावर…तेवढ्यात आली ट्रेन…घटना CCTV मध्ये कैद…

भारतात प्रत्येक रेल्वे फाटकावर गेटमन नेमलेला असतो त्यामुळे रेल्वे फाटकावरील होणाऱ्या अपघाताला आला बसतो, पण बाहेर देशात स्वयंचलीत रेल्वे फाटक असल्यानं त्या ठिकाणी काळजी घेणे आवश्यक आहे. घाईगडबडीत रेल्वे फाटक ओलांडताना अनेकदा लोक अपघाताला बळी पडतात हे तुम्ही पाहिले असेलच. अशाच एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला हसू येईल.

खरं तर, एक मोठा ट्रक रेल्वे फाटकातून जात होता, पण तेवढ्यात फाटक बंद करून ट्रेन आली. त्यानंतर घडलेल्या भीषण अपघाताने त्याला आश्चर्याचा धक्का बसला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की 18 चाकी ट्रक कसा रेल्वे फाटक ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अचानक फाटक बंद झाल्याने तो पूर्णपणे ओलांडू शकला नाही. फाटक बंद होताच काही सेकंदातच एक वेगवान गाडी तेथे येऊन ट्रकच्या मागील बाजूस धडकली, त्यामुळे ट्रक पूर्णपणे पलटी झाला. या अपघातात मोठी हानी होऊ शकली असती, मात्र काही वाहने वेळेतच तेथून मागे हटली नाहीतर तीही अपघाताच्या कचाट्यात आली असती.

या ट्रेन आणि ट्रक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @NoCapFights नावाच्या आयडीवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 45 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख 53 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईक करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कोणीतरी म्हणतंय की ‘हा अपघात जाणूनबुजून झालेला दिसतोय, कारण त्यावेळी त्या ट्रकच्या वाटेत काहीच नव्हतं. त्याला येताना पाहून सर्व वाहने निघून गेली होती. ट्रक ड्रायव्हरने याकडे लक्ष दिले नाही असे नाही, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘ही इन्शुरन्स फ्रॉड आहे. ट्रक चालकाला तुरुंगात बंद करा.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: