Sunday, December 22, 2024
Homeराज्य१७ व्या अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिध्द...

१७ व्या अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिध्द साहित्यिक प्रा.शरद गोरे यांच्या हस्ते होणार…

१८ ऑगस्टला संमेलनाचे आयोजन…

मुंबई – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने १७ वे अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे १८ ऑगस्ट २०२४ रोजी वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील
तळेगाव ( शामजी पंत ) येथे होणार असून या साहित्य संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिध्द साहित्यिक प्रा.शरद गोरे यांच्या हस्ते होणार आहे,

छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेल्या बुधभूषण या ऐतिहासिक ग्रंथाचा मराठी काव्य अनुवाद त्यांनी केला असून शेतकर्यांच्या आत्महत्या की हत्या यासह १० विपूल ग्रंथाचे लेखन गोरे यांनी केले आहे,

रणांगण,प्रेमरंग,उषःकाल,एैतवी,सूर्या, फुल टू हंगामा,आदी मराठी चित्रपट त्यांनी लेखक,दिग्दर्शक,निर्माता,संगीतकार व अभिनेता म्हणून केले आहेत,आजवर विविध विषयांवर त्यांनी हजारो व्याख्याने दिली आहेत, इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून ते महाराष्ट्रास परिचित आहेत तेवढेच आपल्या अमोघ वाणीतील व्याख्यानासाठी हि ख्यातकीर्त आहेत
उद्घघाटन,परिसंवाद कविसंमेलन असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे,

एकदिवसीय होणार्या या साहित्य संमेलनास मोठया संख्येने साहित्यिक उपस्थित राहणार आहे, या संमेलनात विविध साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, महात्मा फुलेंच्या यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून या साहित्य संमेलनाचे आयोजन दरवर्षी राज्यात विविध ठिकाणी केले जाते,

या पूर्वी पुणे,सोलापूर,गोंदिया,रामटेक या ठिकाणी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी साहित्य परिषदेचे वर्धा जिल्हाध्यक्ष नरेंद्र गुळधाने हे समर्थपणे पार पाडत आहेत,साहित्य परिषदेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रा.मिलिंद रंगारी,विदर्भ कार्याध्यक्ष नामदेव राठोड, विदर्भ महिला आघाडी प्रदेशाघ्यक्षा संगीता बांबोळे, अमरावती विभागीय अध्यक्ष शिवा प्रधान ,आदीजण संमेलनाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेत आहेत,आ्ष्टी तालुक्यात प्रथम होणार्या हे साहित्य संमेलन साहित्य रसिकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: