Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीगोवंश जातीच्या जनावराचे मांसासह १६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त...आकोट पोलिसांची कार्यवाही.

गोवंश जातीच्या जनावराचे मांसासह १६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त…आकोट पोलिसांची कार्यवाही.

दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी आकोट पोलिसांनी शहरातील अन्सार कॉम्प्लेक्स जवळील इफ्तेखार प्लॉट येथे गोवंश मांसाची विक्री करणाऱ्यांवर छापा घातला. यावेळी गोवंश जातीचे जनावराचे मांस (बैल) ८० किलो किं. अं. १६०००रू , कत्तलीकरीता लागणारे साहित्य एक सुरा किं.अं.१०० रु, एक लाकडी ठोकळा किं. अं. ५० रू, एक वजन काटा किं. अं. ३००रू, व एक ५०० ग्रॅम वजन गोटा किं. अं. १०० रु, एक कुऱ्हाड किं. अं. २०० रु असा एकूण १६७५० रु. चा माल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी रितु खोखर, पो. नि. प्रकाश अहिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि. राजेश जवरे, पोहेकॉं उमेश सोळंके, उमेश पराये, नापोका विजय चव्हाण, पोकॉं. मनिष कुलट, सागर मोरे यांनी केली. पुढील तपास पोहेकॉं उमेश सोळंके हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: