अकोला : मुंबई, नाशिक, नागपूर येथे गोवर रोगाने कहर केल्यानंतर नंतर आता अकोल्यातही गोवर सदृश्य तापाचे १६ रुग्ण आढळले असल्याने खळबळ उडाली आहे. शहरी भागात ६ आणि ग्रामीण भागातून १० रुग्ण आहेत. आरोग्य विभागाकडून त्यांचे नमुने तपासणीसाठी मुंबई पाठविण्यात आले आहे. कुठल्याही प्रकारचा ताप किव्हा सर्दी असल्यास डॉक्टरांचा सल्ला अस आव्हाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. यासोबतच ज्या बालकांनी गोवरची लस घेतली नसेल त्यांना लस घेण्याचं आव्हाहन सुद्धा करण्यात येत आहे.
तर मुंबईत गोवर रुग्णांची संख्या २३३ इतकी झाली आहे. तसेच १५६ संशयित रुग्ण आढळले आहेत. सोबतच मृतांच्या संख्येतही वाढ होत असल्याने आरोग्य विभागाच टेन्शन वाढलय. यावर अकोल्याच्या जिल्हा शल्यचिकित्सक तरंग तुषार वारे यांनीकाळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ताप आल्यास मुलांना तातडीने नागरी आरोग्य केंद्रात घेऊन या. त्याच्यावर उपचार सुरू होतील आणि गोवर असेल तर वेळीच आजार आटोक्यात येईल. मात्र उपचारास उशीर झाला तर ते मुलांच्या जिवावर बेतू शकते…