मुंबई – गणेश तळेकर
मराठी रंगभूमीवर प्रेम करणारे तुम्ही रसिक प्रेक्षक, कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांच्या सहकार्यामुळे अलबत्या गलबत्या या बालनाट्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. गेल्यावेळी आम्ही याच श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात सलग पाच प्रयोग केले होते आणि तो आमचाच विक्रम मोडत आज आम्ही रंगभूमीवर एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. सलग सहा प्रयोग करण्याचा ”World Record” अलबत्या गलबत्या या व्यावसायिक बालनाट्याने प्रस्थापित केला आहे.
बालक पालक रसिक प्रेक्षकांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो…. निर्माता राहुल भंडारे, अद्वैत थिएटर्स