शहापूर – प्रफुल्ल शेवाळे
15 लाखांची स्टील चोरी प्रकरणी शहापूर पोलिसांनी आरोपीना 24 तासात गजाआड करून एक दबंग कामगिरी पार पाडली आहे. सदर आरोपी हे टिटवाळा परिसरातील असल्याची माहिती हाती येत आहे. आजकालच्या अद्यावत तांत्रिक माहिती च्या आधारे पोलिसांनी सदर कामगिरी पार पाडली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील आसनगाव पुलाजवळ 4-5 दिवस बंद पडलेल्या ट्रेलर मधून बांधकाम करिता वापरल्या जाणाऱ्या स्टील ची चोरी करण्यात आली होती. या मालाची किंमत जवळ पास 15 लाख एवढी आहे.
17 ऑक्टोबर ला घडलेली चोरीच्या घटनेची फिर्याद शहापूर पोलीस स्टेशनं ला दिनांक 23 ऑक्टोबर रोजी करण्यात आली.. गुन्हा रजिस्टर नं. 377 भारतीय दंड विधान सहिंता कलम 379 /34 प्रमाणे गुन्हा नोंदणी करण्यात आला होता.
मुंबई आग्रा महामार्ग वरील cctv फुटेज व मोबाईल वरून मिळालेली तांत्रिक माहिती या द्वारे शहापूर पोलिसांनी मुख्य आरोपी अरमान शेख (वय 24) याच्या इतर 4 आरोपीना अवघ्या 24 तासात पकडून गजाआड केलं आले.. सदर आरोपी टिटवाळा परिसरातील असल्याची माहिती हाती येत आहे.
पोलीस उपविभागीय अधिकारी श्री.मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक श्री. अनंत पराड यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलिसांनी पथकाने सदर कामगिरी पार पाडली आहे..शहापूर पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरी ची परिसरात जोरदार चर्चा आणि कौतुक होत आहे…