सांगली – ज्योती मोरे.
पानिपत येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली देण्यासाठी मराठा जागृती मंचचे वतीने 22 वर्षांपासून हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. पानिपत युद्धात वाचलेल्या व हरियाणा येथे स्थायिक झालेल्या मराठा सैनिकांच्या वंशांजाचे संशोधन कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे व हरियाणाचे माजी सनदी अधिकारी श्री वीरेंद्र मराठा यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
कर्नाल पासून रॅलीने कार्यक्रमाची सुरुवात होते व बसताडा येथे रॅलीची सांगता होऊन रॅलीचे रूपांतर सभेत होते त्यावेळी महाराष्ट्र सह भारताच्या विविध राज्यातून आलेल्या बांधवांचा सत्कार करण्यात येतो. या कार्यक्रमाला सांगलीच्या युवा समाजसेविका जयश्रीताई पाटील या देखील उपस्थित होत्या.
दरम्यान, वीरेंद्र मराठा यांच्या हस्ते समाजसेविका जयश्रीताई पाटील यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच या कार्यक्रमाला छत्तीसगड,कर्नाटक,गोवा,गुजरातमध्य प्रदेश,उत्तराखंड,सह महाराष्ट्रातल्या 22 जिल्ह्यातून पानिपत प्रेमी कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाला होळकर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष नवरत्न होळकर,वस्ताद गावचे सरपंच श्री सुरेश मराठा पूर्व सरपंच राजेंद्र मराठा ,श्री बाजीराव खाडे,श्रीमंत कोकाटे,मराठा जागृती मंचचे राष्ट्रीय समन्वय श्री मिलिंद पाटील,समाजसेविका जयश्री पाटील सांगली आदी उपस्थित होते.