Sunday, December 22, 2024
Homeराज्यभगवान बिरसा मुंडा यांची १४८ वी जयंती साजरी...

भगवान बिरसा मुंडा यांची १४८ वी जयंती साजरी…

रामटेक – राजु कापसे

पारशिवनी तालुक्यातील कन्हान ईथे आदिवासी समाज बांधवांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन आणि भगवान बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारभी आदिवासी दिनानिमित्त क्रांतीकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे समाज बांधवांच्या वतीने पुजन करण्यात आले.

बिरसा मुंडा जयंती निमित्त आदिवासी समाजातील मुला- मुलीनी पारंपारीक वेशभूषा परिधान करत आदिवासी गीतांवर पारंपारीक नृत्यांचे सादरीकरण केले.दिनांक १५/११/२०२३ ला कन्हान येथील कुलदीप मंगल कार्यालय येथे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची १४८ वी जयंती निमित्त रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री चंद्रपाल चौकसे (अध्यक्ष राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भेट देऊन शुभेच्छा दिल्या व पारितोषिक वितरण केले.

यावेळी श्री विशाल बरबटे, श्री नरेश बर्वे, सौ राखी पराते, सौ रश्मीताई बर्वे माजी जी प अध्यक्ष, दिनेश शेराम, सौ करुणाताई आष्टनकर नगराध्यक्ष, शंकर इनवाते, रजनीश मेश्राम, सुरज वरखडे, अभिजित चांदेकर, लोकेश जामकर, गगन सिरसाम, सतीश घारड, कैलास खंडार हेमराज चोखांद्रे आदीची उपस्थिती होती

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: