दोन सत्रात पार पडली इयत्ता ५ वी व ८ वी ची परीक्षा…वर्ग ५ वी च्या परीक्षेदरम्यान ४८ तर ८ वी च्या परीक्षेदरम्यान ३१ विद्यार्थी गैरहजर
राजु कापसे
रामटेक
आज दि. ३१ जुलै ला तालुक्यात १३ केंद्रावर वर्ग ५ व वर्ग ८ वी च्या एकुण १३२३ विद्यार्थांनी शिष्यवृत्तीची परीक्षा दिली. दोन सत्रात पार पडलेल्या या शिष्यवृत्ती परीक्षेला तब्बल ७९ विद्यार्थी अनुपस्थीत राहीले हे येथे विशेष.
रामटेक पंचायत समीतीच्या शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी तभाणे मॅडम यांनी दिलेल्या माहीतीनुसार, आज वर्ग ५ वी व वर्ग ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात आलेली होती. सकाळी ११ ते दुपारी १२.३० तर दुपारी १.३० ते ३.०० वाजतापर्यंत अशा दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात आली होती.
तालुक्यातील एकुण १३ केंद्रावर एकुण १३२३ विद्यार्थ्यांनी आज दि. ३१ जुलैला परीक्षा दिली. तालुक्यातील १३ परीक्षा केंद्रांवर ५ व्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये, श्री चक्रधर स्वामी विद्यालय मनसर येथे ११८ विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थी गैरहजर राहील्याने १०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, जयसेवा आदर्श विद्यालय पवनी येथे ९८ विद्यार्थ्यांपैकी ३ विद्यार्थी गैरहजर राहील्याने ९५ विद्यार्थांनी परीक्षा दिली, नवजिवन हायस्कुल व कनीष्ट महाविद्यालय पथरई येथे ६७ पैकी ६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, स्वामी विवेकांनंद विद्यालय देवलापार येथे ७९ विद्यार्थ्यांपैकी १ विद्यार्थी गैरहजर राहील्याने ७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, जिल्हा परीषद हायस्कुल वडंबा येथे ९० पैकी ९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
संत ज्ञानेश्वर विद्यामंदीर महादुला येथे ५० विद्यार्थ्यांपैकी ३ गैरहजर राहिल्याने ४७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, स्व. ॲड नंदकिशोर जयस्वाल विद्यालय काचुरवाही येथे ७५ विद्यार्थ्यांपैकी ३ गैरहजर राहिल्याने ७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, नंदीवर्धन विद्यालय व ज्यु कॉलेज नगरधन येथे १३६ पैकी १ गैरहजर राहिल्याने १३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, राष्ट्रीय आदर्श विद्यालय व ज्यु कॉलेज रामटेक येथे २०८ विद्यार्थ्यांपैकी २७ गैरहजर राहिल्याने १८१ विद्यार्थांनी परीक्षा दिली.
तर वर्ग ८ वी तील विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये प्रोव्हीडंस इंग्लीश स्कुल मनसर येथे ८२ विद्यार्थ्यांपैकी ५ गैरहजर राहिल्याने ७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
उदय विद्यालय देवलापार येथे १३१ विद्यार्थ्यांपैकी १५ गैरहजर राहिल्याने ११६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, स्व. इंदीरा गांधी विद्यालय नगरधन येथे ७५ विद्यार्थ्यांपैकी १ गैरहजर राहिल्याने ४७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर समर्थ हायस्कुल रामटेक येथे १९३ विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थी गैरहजर राहिल्याने १८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.