रामटेक – राजु कापसे
वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनाइजेशन रामटेक च्या सर्पमित्र व प्राणीमित्र समाज सेवी संस्थेच्या माध्यमातून वाचाविले अजगराचे प्राण. रामटेक जवळच्या पिपरिया पेठ खिंडसी रोड च्या पहाडीच्या मागच्या बाजूला एका अज्ञात व्यक्तीच्या घराजवळ रात्री एक मोठा साप रोड च्या बाजूला दिसुन आला.
तो साप पाहताच तिथल्या एका जागरूक व्यक्तीने त्वरित वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे सर्पमित्र, प्राणी मित्र अजय मेहरकुळे यांना एक मोठा साप असल्याची माहिती दिली.
त्यांनी त्वरित वेळ न घालवता सर्प मित्र मंथन सरभाऊ, नक्की विश्वकर्मा ला घटनास्थळी पाठविले. घटनास्थळी पोहचताच एक खूप मोठा १३ फुट लांबी चा अजगर indian rock python साप असल्याचे निदर्शनास आले तो अजगर असल्यामुळे त्याला मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. तो साप १३ फुट लांब १८ इंची ची मोटाई व ४८ किलो वजनाचा आहे.
त्या अजगर सापाला सुखरूप पकडून रामटेक वन विभागात माहिती देऊन पंचनामा करून वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनाइजेशन चे अध्यक्ष राहुल कोठेकर व रामटेक चे फॉरेस्ट राउंड ऑफिसर गोमासे यांच्या समक्ष जवळच्या जंगलात नेवून सुखरूप सोडण्यात आले