खामगाव – महाराष्ट्र पोलीस तसेच भारतीय सेना मध्ये भरतीसाठी अनेक गरजू उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी त्रास होत आहे. याची दक्षता घेऊन भाजप कार्यालयात आज 29 व 30 नोव्हेंबर रोजी मोफत ऑनलाइन अर्ज भरण्याचा उपक्रम ठेवण्यात आला आहे. आज 29 नोव्हेंबर रोजी 127 तरुण तरुणींनी या उपक्रमाला प्रतिसाद देत आपला अर्ज भरला.
भाजप जिल्ह्याध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे आदेशानुसार भाजयुमो, भाजप विद्यार्थी आघाडी व डिजिटल सायबर कॅफे यांनी पोलीस व भारतीय सेना भरती मध्ये जाणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करताना त्रास होऊ नये यासाठी टॉवर चौक खामगाव येथील भाजप कार्यालय येथे विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये भाजप कार्यालयात ज्या पोलीस व सेनेत सेवा देण्याची इच्छा असलेल्या सर्वाना मोफत अर्ज भरण्याची सुविधा देण्यात येत आहे.
महाराष्ट्र पोलीस , राज्य राखीव दल, तसेच सेने मध्ये BSF, SSB, CISF, ITBP , व आसाम रायफल्यस मधील भरती साठी अर्ज करण्याची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत होती . अनेक इच्छुक तरुणांना ऑनलाइन अर्ज करण्यात अडचण येत होती, तसेच काही सायबर चालक अधिक पैसे घेत असल्याने गरीब तरुण, तरुणांची आर्थिक ऐन वेळेवर धावपळ होत होती, हीच बाब भाजप जिल्हाध्यक्ष तथा युवा आमदार अँड आकाश फुंडकर यांना समजतात त्यांनी लगेच सूचनेनुसार भाजप कार्यालयात मोफत ऑनलाइन मोफत अर्ज भरण्याची सोय केली.
त्यानुसार सर्व पोलीस व भारतीय सेनेच्या सेवेत जाण्यासाठी असलेल्या गरजू उमेदवार यांनी भाजप कार्यालयात सकाळ पासूनच गर्दी केली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 127 तरुण, तरुणींनी पोलीस व भारतीय सेना भरतीचे ऑनलाइन अर्ज भाजप कार्यालयाच येऊन भरले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी पोलीस भरती साठी 15 डिसेंबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदतवाढ दिली आहे.
परंतु भारतीय सेनेच्या भरतीची तारीख उद्या 30 नोव्हेंबर हीच आहे. तरीसुद्धा पोलीस भरती व सेनेत भरती होणाऱ्या इच्छुकांनी टॉवर चौक, भाजप कार्यालयात 11 ते 5 वेळात येऊन मोफत अर्ज भरावा असे आवाहन विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड यांनी केले आहे.