पिंपरी : भारतरत्न कै. जे.आर.डी .टाटाच्या 29 जुलै २०२२ रोजी असणाऱ्या ११८ वी जयंतीचे औचित्य साधून टाटा मोटर्स ७०९, जिव्हाळा परिवार, ई ब्लॉक व वृक्षदायी प्रतिष्ठान देहूगाव यांच्यातर्फे पिंपळ ,लिंब अश्या ११८ देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात देहूमधील भंडारा डोंगरावर करण्यात आले. हे वृक्षारोपण तुकाराम महाराज यांचे वंशज महाराज ह.भ.प. श्री शिवाजी मोरे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले.
तसेच लोकांमध्ये वृक्षारोपणाविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून भंडारा डोंगर प्रवेशद्वारापासून ते वृक्षारोपणाच्या जागेपर्यंत सकाळी वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्षदिंडी मध्ये ह भ प श्री आव्हाड महाराजचे भजनी मंडळ, टाटा मोटर्सच्या कुटुंबीयांमधील महिला भगिनी, छोटी मुले , टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकारी, सर्व कामगार बंधू अशा ३५० जणांनी या वृक्षारोपण मोहिमेत भाग घेतला.
तसेच या झाडांसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून टाटा मोटर्स ७०९ जिव्हाळा परिवार कडून पाच हजार लिटर पाण्याची टाकी ही वृक्षदायी संस्थेला भेट देण्यात आली. या टाकीमुळे उन्हाळ्यात या झाडांना पाणी घालण्यास मदत होणार आहे.वृक्षारोपणा नंतर महाराज ह.भ.प. श्री शिवाजी मोरे यांचे संबोधन व समाजसेविका शारदा अक्का मुंडे यांचे ‘आईचे काळीज’ यावरील व्याख्यान ही पार पडले.
या कार्यक्रमाचे नियोजन श्रीकांत कदम, जयवंत तावरे ,हंसराज शेलार, संभाजी महींद ,किरण कांबळे, विश्वनाथ गवळी ,उत्तमराव चौधरी, रवींद्र निकम, शिवाजीराव कणसे ,गणेश मुंगसे ,शहाजी नरे प्रवीण डाके, विजय वाघोले, अशोक भोर, ,अमोल पाटील, अजित पाटील, रवींद्र शिंदे, संतोष लोंढे साहेब ,शरद रडके ,देशमाने विकास पिंगट, जितेंद्र नारखेडे, संभाजी महिंद ,दत्तात्रय कदम बसवराज इंगळगी, बाळासाहेब राक्षे, यांनी केले .श्रीकांत कदम यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले अमोल पाटील यांनी प्रास्ताविक केले .किरण कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.