नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता पोलीस अधिक्षक यांनी जी. बी. दळवी पोलीस उप निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन यांना आदेशीत केले होते. त्यानुसार त्यांनी सायबर पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेण्याची मोहीम राबविली.
नादेड जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचे अंमलदार व स्थागुशाचे पथकाने जिल्ह्यातील गहाळ झालेल्या इतर जिल्ह्यातील व राज्याबाहेरील मोबाईलचा शोध घेवून एकूण 118 मोबाईल किंमत 18,85,000/- रूपयाचे मोबाईल हस्तगत केले आहेत त्यांचे आज एकत्रितरीत्या जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते 60 मोबाईलचे वाटप करण्यात आले आहे.
उर्वरीत हस्तगत झालेले मोबाईलचे IMEI क्रंमाकाची माहिती नांदेड पोलीस दलाचे Facebook Page (Nanded Police), Twitter (#Nanded Police) वर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी नागरीकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा IMEI क्रंमाक ओळखुन सायबर पो.स्टे. नांदेड येथून मोबाईल घेवून जाण्याचे अवाहन मा. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक यांनी केले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, डॉ खंडेराय धरणे अपर पोलीस अधिक्षक भोकर, श्रीमती डॉ अश्विनी जगताप पोलीस उपअधिक्षक (गृह), पो नि जगदिश भंडरवार, पो नि. स्थानिक गुन्हे शाखा उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पो.स्टे. चे पोउपनि गंगाप्रसाद दळवी व पोलीस अंमलदार सुरेश वाघमारे,
राजेन्द्र सिटीकर, दिपक ओढणे, रेशमा पठाण, विलास राठोड, दाविद पिडगे, गणेश वाघमारे, किरणकुमार वाघमारे, कृष्णा तलवारे, बालाजी सातपूते, मोहमद आसीफ, एजाजखान पठाण, काशिनाथ कारखेडे, अनिल बिरादार, दिपक शेवाळे, किशोर जैस्वाल, राजीव बोधगिरे, विलास कदम, अकबर पठाण, व्यंकटेश सांगळे, दिपक राठोड यांनी पार पाडली.