Sunday, December 22, 2024
Homeराज्यखामगाव येथे धनकुबेर मंदिर चे वर्धापन दिना निमित्य १,११,१११ भव्य रुद्राक्ष वाटप...

खामगाव येथे धनकुबेर मंदिर चे वर्धापन दिना निमित्य १,११,१११ भव्य रुद्राक्ष वाटप होणार…

हेमंत जाधव

खामगाव शेगाव रोड वर सिद्धी विनायक टेक्निकल कॅम्पस जवळ धनकुबेर मंदिर आहे या मार्च 2023 मध्ये मंदिराचा वर्धापन सोहळा मोठ्या थाटात आणि उत्साहात होणार असल्याचे मंदिराच्या अध्यक्षांनी सांगितले . या निमित्य २१/०३/२०२३ रोजी (दस अमावस्या) गृहक्लेश, व्यापार वृद्धी, कर्ज मुक्ती, धन प्राप्ती, रोग व्याधी आदीं पासून मुक्ती, नजर दोष आदीं कारणांसाठी ११ कुंड आणि ५१ जोडप्यांचा महारुद्र महायज्ञ व तदनंतर महाप्रसादा चे वितरण होणार आहे.

२२/०३/२०२३ रोजी गुडीपडव्याच्या शुभ मुहूर्तावर कुबेर महालक्ष्मी रुद्र महायज्ञतून सिद्ध झालेले रुद्राक्ष (१,११,१११ रुद्राक्ष) चे वाटप सकाळी ११ ते संधकाळी ६ वाजेपर्यंत राहील. याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष श्री इंद्रदेव महाराज यांनी केले आहे. रुद्राक्ष मिळविण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मध्यप्रदेश येथील सिंहोर येथे गेले होते पण तिथे रुद्राक्ष न मिळाल्याने खाली हात निराश होऊन परत आले पण आता आपल्या शहराच्या जवळच असलेल्या कुबेर मंदिरात रुद्राक्ष मिळविण्याची संधी आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: