Monday, December 23, 2024
Homeराज्यनांदेड जिल्हयातील मोबाईल मिसींग मधील १६,३३,०००/- रूपयाचे ११० अँड्रॉईड मोबाईल हस्तगत; सायबर...

नांदेड जिल्हयातील मोबाईल मिसींग मधील १६,३३,०००/- रूपयाचे ११० अँड्रॉईड मोबाईल हस्तगत; सायबर शाखेची कार्यवाही…

महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पो.स्टे. सायबर पोलीस निरीक्षक ओमकांत आनंदराव चिंचोळकर यांना आदेशीत केले होते. पो.स्टे. सायबर यांनी त्यानूसार सायबर सेल स्था.गु.शा. व नांदेड जिल्हयातील सर्व उपविभागाचे पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेणेची मोहीम राबविण्यात आली होती.

नांदेड येथील उपविभागातील पथकाने व स्थागुशाच्या पथकाने जिल्हयातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळया ठिकाणी जावून नांदेड जिल्यातील एकूण 110 मोबाईल किंमत 16,33,000/- रूपयाचे हस्तगत केले आहेत. त्यांचे आज एकत्रितरीत्या मा. पोलीस अधिक्षक साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

शोध झालेल्या मोबाईलचे IMEI क्रमांकाची माहिती नांदेड पोलीस दलाचे “Nanded Police” या Facebook Page व Twitter वर टाकण्यात आली आहे. त्यापैकी नागरीकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक ओळखुन सायबर पो.स्टे. नांदेड येथून मोबाईल घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे..

सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, नांदेड डॉ. श् खंडेराय धरणे, भोकर, गृह पोलीस उपअधिक्षक श्रीमती डॉ. अश्विनी जगताप पो. नि. डी. जी. चिखलीकर, पो. नि.. ओमकांत आनंदराव चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.स्टे सायबर पोउपनि जी. बी. दळवी, एस.एन. थोरवे,

पोलीस अमलदार सुरेश वाघमारे, राजेन्द्र सिटीकर, दिपक ओढणे, रेश्मा पठाण, अनिता नलगोंडे, दाविद पिडगे, दिपक शेवाळे, मोहन स्वामी, किशोर जैस्वाल, व्यंकटेश सांगळे, सौरभ सिद्धेवार यांनी पार पाडली. सदर कामगीरी बाबात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व पथकाचे अभिनंदन केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: