Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsबस-कारच्या भीषण अपघातात ११ जण जागीच ठार...बैतूल येथील घटना...

बस-कारच्या भीषण अपघातात ११ जण जागीच ठार…बैतूल येथील घटना…

मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये बस आणि कारच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. बैतूलच्या झाल्लार पोलीस ठाण्याजवळ बसची कारला धडक बसून झालेल्या या भीषण अपघातात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बेतुलचे एसपी सिमला प्रसाद यांनी सांगितले की, अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

कारमधील सर्व लोक अमरावती येथून आपल्या घरी जात असताना वाटेत तवेरा कार चालकाला डुलकी लागली आणि कार समोरून येणाऱ्या बसला धडकली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. गाडीचे चित्र पाहून हा अपघात खूपच भीषण असावा असा अंदाज बांधता येतो. या दुर्घटनेत जीव गमावलेले लोक राज्यातील की अन्य ठिकाणचे होते, ही माहिती सध्या तरी समोर आलेली नाही. याच्या दोनच दिवसांपूर्वी मुरैना जिल्ह्यात मंगळवारी एक वेदनादायक रस्ता अपघात झाला. डंपर आणि बोलेरो यांच्यात झालेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: