Saturday, December 21, 2024
HomeBreaking Newsआलेगावातील 108 रुग्णवाहिका बनली शोभेची वस्तू...रुग्णाची होत आहे परवड

आलेगावातील 108 रुग्णवाहिका बनली शोभेची वस्तू…रुग्णाची होत आहे परवड

निशांत गवई, पातुर

पातूर : आलेगांव येथील 108 रुग्णवाहिका एक डॉक्टरच्या भरवशावर चालत असल्यामुळे,माकडाने गंभीर रित्या हल्ला केलेल्या रुग्णाला डॉ अभावी अकोला येथे उपचारा करिता न्यावे लागल्याची घटणा दि 12 रोजी घडली या मुळे, रुग्णाची मोठी परवड झाली असून, या गंभीर बाबी कडे संबंधित अधिकाऱ्यानी वेळीच लक्ष देऊन रुग्णवाहिकेवर डॉ वाढ़वून देण्याची मागणी होत आहे.

पातुर तालुक्यातील आलेगाव प्रा आ केंद्रा अंतर्गत जवळपास 30 ते 40 खेडी गावे लागून असल्यामुळे बरेच वेळा ग्रामीण भागातुन घटना दुर्घटना झालेल्या रुग्णाना अकोला येथील उपचाराची गरज भासते अशा वेळेस गरीब गरजू रुग्णाना 108 रुग्णवाहिका वरदान ठरत आली आहे.परंतु गेल्या दोन महिन्या पासुन सदर रुग्णवाहिके वर एकच डॉक्टर उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी परवडत होत असल्याचा प्रकार नुकताच समोर आला असून दि 12 रोजी आलेगाव येथील शेख सलीम यांच्या घराच्या छतावर माकडाच्या झुंडीने मोठा उच्छाद घातला असता त्यांना हुसकवण्या साठी शेख सलीम प्रयत्न करीत असताना त्याचेवर अनेक माकडानी गंभीररित्या जखमी केले असता जखमी सलीम यांच्या मदतीला येथील पत्रकार मो इमरान धाऊन गेले आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारा दरम्यान आणले असता स्थानिक डॉक्टरनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारा करिता अकोला येथे नेण्याचे सांगितले त्या नुसार पत्रकार मो इमरान यांनी रुग्णवाहिलकेशी संपर्क केला. परंतु सदर रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेले डॉ रजेवर असल्यामुळे, रुग्णवाहिका पायलटणे वरिष्ठाच्या आदेशा नुसार डॉ विना रुग्णाला उपचारा करिता अकोला येथे नेण्यात आले. यामुळे रुग्णांची मोठी परवड झाल्याचे समजले तरी संबंधितानी या गंभीर बाबीची दखल घेऊन रुग्णवाहिकेवर डॉ वाढवून देण्याची मागणी होत आहे.

गावात माकडाची दहशत.

गावात माकडाच्या झुंडीने शिरकाव केला असून घराच्या छतावर तसेच वेळप्रसंगी घरात धुडगूस घालने या प्रकारात वाढ़ झाली असून ग्रामस्थामध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. तरी वन विभागाने माकडाचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

माकडाने हल्ला केलेल्या जखमी शेख सलीम यांची चौकशी करून वरिष्ठाकडे अहवाल पाठविला आहे तसेच ग्रामस्थांनी केळी उष्टी पदार्थे घरा बाहेर अथवा छतावर टाकू नये. जेणे करून माकडे येना र नाहीत व अशा घटनेला आळा बसेल

सैय्यद मुक्तार
दरोगा वन कार्यालय आलेगाव

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: