वंचीत बहुजन आघाडी मुर्तिजापुर वतीने आयोजन सर्व तज्ज्ञ डॉक्टरांची होती उपस्थिती… कोरोना काळात रुग्णांसाठी अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टरांना संविधान सन्मानचिन्ह व सर्टिफिकेट देऊन सन्मानित…
मूर्तिजापूर – श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात तालुका वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूरच्या वतीने माता रमाई व राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य रोग निदान शिबिराचे आयोजन शुक्रवार, २ जून २०२३ रोजी करण्यात आले होते.
या आरोग्य रोगनिदान शिबिरात स्त्री रुग्ण, किडनी, डोळे, मधुमेह, बीपी, सिकलसेल, आयटीसी तसेच विविध तपासण्या करण्यात आल्या. शिबिराचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे ,जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील सरदार,
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रभा सिरसाट, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे, अकोला मनपाचे माजी गटनेते गजानन गवई, जिल्हा परिषद सभापती योगिता रोकडे, रिजवाना परवीन शेख मुखतार, पंचायत समिती सभापती आमग्रपाली तायडे, यांच्यासह जिल्हा व तालुका कार्यकारणी पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, महिला आघाडी युवक आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मूर्तिजापूर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश मनवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर कराळे, चक्रनारायण, डॉ. मोहिनी, डॉ. वानखडे, डॉ. राजेंद्र नेमाडे, डॉ. वाडेकर , डॉ काळे, डॉ. चारथळ, डॉ. भस्मे, डॉ. अन्सारी अशा विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडूनरुग्णांची तपासणी करण्यात आली.
या शिबिराला भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष आकाराम भोरकडे, मोहन रोकडे, शेख मुखतार महिला तालुकाध्यक्ष लक्ष्मी वानखडे, योगिता वानखडे, पंडीत वाघमारे , अंतर्गत बोरकर, संकेत कोल्हे, गौरव मेसरे , अतुल नवघरे ,सुनिल सरोदे शशिकांत सरोदे, मनोज तायडे, सुनील जाधव,उमेश जामनिक , रोशन वानखडे ,
विशाल इंगळे, लकी वाकोडे, विकी गवई, अनिल शिरसाट, मनोज तायडे, सचिन तायडे ,सोनू शेख, रवी इंगळे, नगरसेवक बाळासाहेब खंडारे, ऋषभ इंगळे आदीसह वंचीत बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या शिबिराचा तालुक्यातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.