Monday, December 23, 2024
Homeराजकीयअमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीतून १० जणांची माघार…२३ योद्धे मैदानात…प्रचाराची रणधुमाळी सुरू…यंत्रणा...

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीतून १० जणांची माघार…२३ योद्धे मैदानात…प्रचाराची रणधुमाळी सुरू…यंत्रणा सज्ज….

आकोट- संजय आठवले

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता वैध ठरलेल्या ३३ पैकी १० उमेदवारांकडून अर्ज मागे घेण्यात आल्याने उर्वरित २३ जणांत “राॅयल रंबल” होणार आहे. त्याकरिता उमेदवारांकडून प्रचाराची सुरुवात झाली असून प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे.

या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांची नावे अशी : गोपाल सुखदेवराव वानखेडे, मधुकर दिगांबर काठोळे, प्रा. डॉ. प्रफुल्ल अजाबराव राऊत, राजेश मोतीराम दांदडे, ॲड. सिध्दार्थ मारोतराव गायकवाड, राजेश सोपान गावंडे, किरण अर्जुन चौधरी, पांडुरंग तुकाराम ठाकरे, नामदेव मोतीराम मेटांगे, मीनल सचिन ठाकरे.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे अशी :- धीरज रामभाऊ लिंगाडे (इंडियन नॅशनल काँग्रेस), डॉ. रणजीत विठ्ठलराव पाटील (भारतीय जनता पार्टी), अनिल ओंकार अमलकार (वंचित बहुजन आघाडी), डॉ. गौरव रामदास गवई (बहुजन भारत पार्टी), तर अपक्ष म्हणून अनिल वकटूजी ठवरे, अनंतराव राघवजी चौधरी, अरुण रामराव सरनाईक, ॲड. आनंद रविंद्र राठोड, धनराज किसनराव शेंडे, ॲड. धनंजय मोहनराव तोटे, निलेश दिपकपंत पवार (राजे), उपेंद्र बाबाराव पाटील, शरद प्रभाकर झांबरे पाटील, श्याम जगमोहन प्रजापती, डॉ. प्रविण रामभाऊ चौधरी, प्रविण डिगांबर बोंद्रे, भारती ख. दाभाडे, माधुरी अरुणराव डाहारे, संदेश गौतमराव रणवीर, लक्ष्मीकांत नारायण तडसे, विकेश गोकुलराव गवाले, सुहास विठ्ठलराव ठाकरे, संदीप बाबुलाल मेश्राम.

या उमेदवारांना अमरावती विभागात येणाऱ्या पाच जिल्ह्यातील एकूण २ लक्ष ६ हजार १७२ मतदारांशी संपर्क साधावा लागणार आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ६४ हजार ३४४, अकोला जिल्ह्यातील ५० हजार ६०६, बुलढाणा जिल्ह्यातील ३७ हजार ८९४, वाशिम जिल्ह्यातील १८ हजार ५० तर यवतमाळ जिल्ह्यातील ३५ हजार २७८ मतदारांचा समावेश आहे.

या निवडणुकीचे मतदान ३० जानेवारी रोजी होणार आहे. हे मतदान पाचही जिल्ह्यातील एकूण २६२ मतदान केंद्रांवर होणार आहे. यानंतर मतमोजणी फेब्रुवारी रोजी होणार आहे. अमरावती येथील नेमाणी गोडावून येथे ही मतमोजणी होणार आहे. मतदान व मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्याकरिता १,१५२ लोकांची फौज प्रशासनाने सज्ज केली आहे.

निवडणूक प्रचार, मतदान आणि मतमोजणी या संपूर्ण प्रक्रियेवर निवडणूक निरीक्षक पंकज कुमार, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार हे लक्ष ठेवून आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: