ट्रॅव्हल्स नियंत्रण सुटल्याने उलटली…सहा प्रवाशाचा मृत्यू…तर रुग्णवाहिका ट्रकला पाठीमागून धडकली चौघांचा मृत्यु…
बीड जिल्हात दोन भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झालाय. बीड-अहमदनगर महामार्गवर ट्रकला ॲम्बुलन्स पाठीमागून धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला. हा अपघात दौलावडगाव जवळ रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडला. तर दुसरा अपघात अहमदनगर-बीड राष्ट्रीय महामार्गावर आष्टा फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्यानेखासगी सागर ट्रॅव्हल उलटून सहा प्रवास्यांचा मृत्यू झाला. पहिला अपघात अहमदनगरकडे जात असलेल्या एका ट्रकला नगरकडे रूग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे..
तर आज सकाळी सहा वाजता दुसऱ्या अपघातात अहमदनगर-बीड राष्ट्रीय महामार्गावर आष्टा फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्यानेखासगी सागर ट्रॅव्हल उलटून सहा प्रवास्यांचा मृत्यू झाला. उर्वरित जखमी प्रवाशांना नगर आणि बीड येथे रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे…
आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीतील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ ट्रकला पाठीमागून आलेल्या रुगणवाहिकेने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे, वय 35, रा. धामणगाव ता. आष्टी, मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे, दोन्ही रा. जाट देवळा, ता. पाथर्डी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर डाॅ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के, वय 35, रा. सांगवी पाटण, ता. आष्टी यांचा मॅक केअर हाॅस्पीटल, अहमदनगर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे, वय 45, रा. घाटा पिंपरी, ता. आष्टी हे गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर अहमदनगर येथे उपचार चालु आहेत.