गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
गोंदिया जिल्ह्याला हादळून देणारी घटना 26 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12. 45 वाजता गोंदिया तिरोडा मुख्य रस्त्यावर येत असलेल्या ग्राम दांडेगाव बस स्थानकाजवळ झालेल्या चार चाकी टवेरा गाड़ीचा भीषण रस्ता अपघातात 5 लोकांचा मृत्यु झालेल्यांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतगर्त 10 लाख रुपये राशि देण्यात यावी व जख्मींना 5 लाख रुपये राशि देण्यात यावी असे निवेदन राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा कडून गोंदिया तालुका बुथ प्रमुख रविकुमार (बंटी) पटले यांच्या नेत्तृत्वात गोंदिया जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनाची एक प्रत खासदार प्रफुलभाई पटेल, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्रामजी व माजी आमदार व जिल्हा नियोजन समिति सदर राजेंद्रजी जैन यांना देण्यात आलेली आहे. होत यावेळी करण टेकाम अध्यक्ष नेशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन जिल्हा गोंदिया, राजेशकुमार तायवाडे पत्रकार राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष मिडिया प्रमुख गोंदिया तिरोडा विधानसभा क्षेत्र, रघुवीरसिंग उईके, आरिफ़ पठान, लोकेश नागभीरे व धनलाल नागभीरे उपस्थित होते.