अमोल साबळे – अकोला
अतिवृष्टी, पूरस्थिती, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे यंदा अवघ्या एका रुपयांत पीक विमा देणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील बळीराजाने या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अखेरच्या दिवसापर्यंत राज्यातील १ कोटी ६९ लाख शेतकऱ्यांनी हा विमा काढला आहे आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणात विमा काढण्यासाठी पुढे आले आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत गतवर्षी विमा काढण्यासाठी ९६ लाख
६२ हजार शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. यावर्षी विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. २०२३ च्या हंगामासाठी १ कोटी वाढली आहे. ६९ लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला आहे. विमा काढण्यास शेतकरी उत्सुक असले तरी संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्याने व अन्य तांत्रिक कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विमा काढता आला नाही. राज्यभरात विमा अंदाज होता.
कापूस, सोयाबीन आणि तुरीचा विमा
यावर्षी राज्यभरातील शेतकयांनी कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. अतिवृष्टीने सर्वच शेतकरी धास्तावले आहेत. कधी काय संकट येणार याचा नेम नाही. यामुळे शेतकरी पीक विमा काढण्यासाठी पुढे येत आहेत.
काढण्यासाठी ३ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. या काळात विमा काढणाऱ्याची संख्या
बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी १ कोटी ६३ लाख रुपयांचा विमा काढला, तर केवळ पाच लाख ७५ हजार कर्जदार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. १ कोटी ४२ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होण्याचा
राज्य शासनाच्या १ रुपयाची किमया
आजपर्यंत राज्याच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात पीक विमा काढल्याची नोंद आजपर्यंत झाली नाही. राज्य शासनाच्या निर्णयामुळे हा आकडा विक्रमी झाला आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळाल्यास त्याचा मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
यापैकी १ कोटी १२ लाख हेक्टरवरील पिकांना विमा संरक्षण मिळाले आहे. यावर्षी पीक विमा भरण्याची हमी राज्य शासनाने घेतली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.