Thursday, January 2, 2025
Homeराज्यशेतीच्या वादातून इसमावर कोयत्याने हल्ला; जखमीची प्रकृती चिंताजनक; आरोपीस अटक...

शेतीच्या वादातून इसमावर कोयत्याने हल्ला; जखमीची प्रकृती चिंताजनक; आरोपीस अटक…

पातूर – निशांत गवई

शेतीच्या वादातून इसमास कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना आज पातूर शहरात घडली आहे.
पातूर शहरातील भंडारज शेत शिवारात आज दि.29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान सुरेश बगळेकर रा.शिवाजीनगर,शनिवार पुरा,पातूर व ऋतिक शिवहरी परमाळे रा.बाळापूर वेस,पातूर यांच्यात शेतीच्या धुऱ्यावरून बाचाबाची झाली असता सदर वाद विकोपास गेल्याने रागाच्या भरात ऋतिक परमाळे याने सुरेश बगळेकर (वय अंदाजे 55) यांच्या पाठीवर कोयत्याचा जबरदस्त वार करून गंभीर जखमी केले आहे.

दरम्यान स्थानिक प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने जखमीस प्राथमिक आरोग्य केंद्र पातूर येथे आणून प्रथमोपचार करून 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने पुढील इलाजासाठी सर्वोपचार रुग्णालय,अकोला येथे हलविण्यात आले आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व सदर घटनेतील आरोपी ऋतिक शिवहरी परमाळे (वय अंदाजे 23) यास अटक केली केली असून आरोपी विरुद्ध कलम 109,351,(2) भादवी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी.पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई पातूर पोलीस करीत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: