सांगली – ज्योती मोरे
सांगली विधानसभा मतदार संघातील अंकली, जुनी धामणी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला. अंकली मध्ये ग्रामविकास योजनेंतर्गत २६ लाख रुपये खर्चून नवे ग्रामसचिवालय बांधण्यात येणार आहे. व जुनी धामणी येथे मधुकर सूर्यवंशी घर ते जिल्हा परिषद शाळा रस्त्याचे कॉक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी १६ लाख २७ हजार रुपये रुपयाचा निधी मंजूर आहे.
दरम्यान मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. गावांनी विकासात्मक कामांवर जोर द्यावा नवीन कामे सुचावावित त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार गाडगीळ यांनी यावेळी बोलताना दिली. जुनी धामणी येथे आमदार सुधीर गाडगीळ यांनी जैन बस्ती येथील कामाची पाहणी केली. तसेच महिलांसाठी सामाजिक सभागृह बांधून देऊ अशी ग्वाही दिली.
यावेळी अंकलीचे माजी सरपंच कीर्तीकुमार सावळवाडे, सरपंच काजल गजेंद्र कोलप, विकास सोसायटी चेअरमन महावीर खवाटे, उपसरपंच माधुरी रमेश परीट, सचिव अण्णासाहेब कुमार, ग्रामसेवक ऋतुजा सुतार, पोलीस पाटील, शिल्पा कोलप, जुनी धामणी सरपंच ज्योती कोळी, उपसरपंच रायबा कोळी, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब पाटील, विनोद सुर्यवंशी, योगेश कोळी, नंदा सुर्यवंशी, कविता कोळी, रूपाली सुर्यवंशी, तेजस्वीनी सुर्यवंशी, माजी सरपंच गणपती कोळी, सुभाष पाटील, सचिन कोळी,
जगदीश कोळी, धीरज पाटील, नेमिनाथ चौगुले, कुबेर पाटील, संतोष कोळीसर, जयकुमार पाटील, माजी सरपंच अण्णा चौगुले, मोहन सकट, लक्ष्मण कोळी, बालाजी कोळी, सतीश सूर्यवंशी, अमित कोळी, शितल मगदूम, शैलजा पाटील, अंजली पाटील, वर्षा पाटील, पुष्पांजली पाटील, अलका पाटील, भारत चौगुले, सविता कोळी, सुशीला पाटील, सारिका पाटील, बंटी मगदूम, दिपाली कोळी, अश्विनी कोळी, उज्वला पाटील, चंद्रकांत पोळ, गणपती साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चंद्रकांत गुरव, ग्रामसेवक आदी मान्यवर नागरीक उपस्थित होते.