वाषिक स्नेहसंमेलन साजरे

डिगोळ(बाबूराव बोरोळे)
 सताळा(बू)ता उदगीर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वाषिक स्नेहसमेलन मोठ्या हषोल्हासात शनिवारी सांयकाळी पार पडले. यावेळी बिरादार तुळशीदास गुरूजी लिखित व दिग्दर्शीत तीन अंकी नाटक तमाशा लोकशाहीचा!प्रयोग चिमुकल्या शालेय विद्यार्थ्यानी सादर केला. निवडणुकीच्या धुराळयात लोकशाहीची होणारी ऋ्रर चेष्टा व व्यथा चिमुकल्यानी प्रभावी पणे मांडली. यावेळी नाटयरसिकानी भरभरुन प्रतिसाद दिला. तसेच अंनत कदम संयोजक वाचक संवाद यांच्या व लहान बालकाच्या हस्ते तुळशीदास बिरादार लिखित संसार मुक्याकळीचा या नाटकाच्या पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले आहे. या प्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ तिरुके होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केद्रप्रमुख शिवशंकर पाटील वाचक संवादचे संयोजक अनंत कदम प्रा. सुरेश शिंदे प्रा.अजित रंगदळ सरपंच शिवलिंग जळकोटे उपसरपंच अरुणाताई देशपांडे माजी सरपंच सिंधुताई टेंगेटोल पोलीस पाटील यशवंतराव पाटील चेअरमन लक्ष्मण बिरगे माजी सरपंच मधुकर बोके शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष शिवशंकर मठपती मदनराव देशपांडे नागेश बोके संगीतकार ज्ञानेश्वर आळंदे प्रशांत जळकोटे आदिची उपस्थिती होती. यावेळी शाळेच्या चिमुकल्यानी कला गुणातून अंगी असलेल्या कलागुणाचे सादरीकरण शाळेत स्नेहसंमेलातून आई वडिलाना सादर करून दाखविले व गावकऱ्याना मंत्रमुक्त केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार रोडेवाड सौ कल्पना कुलकणी बिभीषण कांबळे तुकाराम पडोळे गंगाधर बिरादार बालाजी नरहरे बालाजी शेटकार सौ बालिका राजगुरू आदिनी परीश्रम घेतले

Comment


अँट्राँसिटी कायदा असावा का ?


Result