नागपूर-जिल्हाप्रतिनिधी
जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते व लेखक ,विचारवंत प्रा.जैमिनी कडू नागपूर यांचे आज दि 17.3.2018 रोजी दुपारी 12 चे दरम्यान निधन झाले आहे. योगायोगाने आजच त्यांचा वाढदिवस ही होता. 
     प्रा. कडू यांचा दि 5 मार्च 2018 रोजी रात्री अपघात झाला होता व त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे ते तेव्हापासून बेशुद्ध  होते व उपचाराला प्रतिसाद देत नव्हते.
     प्रा.कडू हे आदिवासी हलबा तसेच दलित, बहुजन व आदिवासी चळवळीचे आधारस्तंभ होते. विचारवंत,समीक्षक,लेखक,संवेदनशील पत्रकार,वक्ता अशा विविध पैलूंमुळे त्यांचं व्यक्तित्व लोकप्रिय झालं होतं.  

        विद्यार्थी दशेपासूनच त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी जोपासला होता.  महाविद्यालयीन  सामाजिक चळवळीतील   आदिवासी हलबा समाजावरील अन्यायाची त्यांना जाणीव असल्यामुळे त्यांचा या  चळवळीला पाठिंबा होता.बुद्धाचा धम्मच देशाच्या सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय विचारांचा दिशा दर्शक ठरू शकतो,असा त्यांचा प्रचंड विश्वास होता.आपल्या भाषणातून त्यांनी अनेकदा हे स्पष्टही केले होते.सामाजिक आणि राजकीय भाष्य करणारे अनेक पुस्तकेही त्यांनी लिहिली होती.
    प्रा. बी.के.हेडाऊ यांनी लिहिलेल्या जात प्रमाणपत्र : कायदा आणि वास्तव (2007) या पहिल्या पुस्तकाला त्यांचे मनोगत लाभले होते. त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर  त्यांचेवर अंत्यविधी न करता देहदान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.त्या मुळे आज सकाळी १० वाजता त्यांना आदरांजली अर्पण करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर ला त्यांचा मृत्त देह दान करण्यात आला.त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार असून,या प्रसंगी साहित्य,सामाजिक,व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आदरांजली अर्पण करून आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.दरम्यान त्यांच्या अपघाती मृत्यूने आंबेडकरी चळवळीची कधी भरून न निघणारी हानी झाल्याचे मान्यवरांनी सांगितले.

Comment


अँट्राँसिटी कायदा असावा का ?


Result