राजू थोरात सांगली
तासगाव तालुक्याच्या पूर्वेकडील भागातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना ऊस तोडणी मजुरांच्या मनमानीचा फटका बसत आहे. पाणी टंचाईचा गैरफायदा घेऊन ऊस तोडणी मजूर ऊस तोडण्यासाठी दररोज नवीन दर जाहीर करत आहेत. यामुळे मात्र शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे. साखर कारखाना प्रशासनाने  यामध्ये तात्काळ लक्ष घालण्याची मागणी होत आहे. पूर्व भागातील अनेक गावांत अजूनही कारखान्यांनी ऊस तोडणी सुरू केलेली नाही.
तासगाव तालुक्याच्या पूर्वेकडील भागात पुणदी, आरवडे, चिंचणी, मांजर्डे,  बस्तवडे, विसापूर या गावांसह अन्य गावात सध्या ऊस तोडणीची धांदल सुरू आहे.  सध्या या भागात मोठ्या प्रमाणात शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. अनेक ठिकाणी पाण्याअभावी ऊस वाळून चालला आहे. त्यामुळे नुकसान होण्यापेक्षा ऊस कारखान्याला पाठविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.
कारखाना प्रशासन लक्ष घालणार का? 
ऊसतोडणी करणारे मजूर दररोज ऊस तोडण्यासाठी नवीन दर काढताना दिसत आहेत.यामुळे मात्र सामान्य  शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. तोडणी मजुरांची मनमानी रोखण्यासाठी साखर कारखाना प्रशासन लक्ष घालणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result