मुख्याधिकाऱ्यास बेशरमाचे फुले देऊन लाभार्थ्यांनी केली "गांधीगिरी"

महेंद्र गायकवाड
नांदेड
मुदखेड  नगर पालिकेत विविध योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करण्यात आले असून परंतु अनुदानाअभावी लाभार्थ्यांचे घरकुल  अपूर्णावस्थेत आहेत त्यामुळे संतापलेला लाभार्थ्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांना बेशरमाचे म्हणजे फुले देऊन गांधीगिरी केल्याने शहरात खरे "बेशरम "कोण अशी चर्चा होत आहे .
मुदखेड नगरपालिकाअंतर्गत शहरातील लाभार्थ्यांना विविध योजनेतून घरकुल मिळाले असून गेल्या अनेक वर्षापासून या योजनांचे अनुदान टप्याटप्याने मिळत असल्याने लाभार्थ्यांचे घरकुल अपूर्ण अवस्थेत आहेत त्यामुळे या घरकुलाचे अनुदान तात्काळ देण्यात यावे यासाठी अनेक वेळा मुख्याधिकारी व लोकप्रतिनिधींना निवेदन व तोंडी विचारपूस करूनही लाभार्थ्यांना थकीत अनुदान मिळत नाही त्यामुळे त्यांच्या घरकुल  अपूर्ण अवस्थेत आहेत .सन 2014 मध्ये आयएचएसडीपी योजनेअंतर्गत भीमनगर येथील राहुल चौदंते यांना घरकुल मंजूर झाले व त्याचे काही धनादेश मिळाले व घरकुल योजना ही अंतिम टप्प्यात आल्याने गेल्या चार वर्षापासून काही धनादेश न मिळाल्यामुळे त्यांचे घरकुल पूर्ण होऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना गांधीगिरी पद्धतीने सत्कार करण्याची निवेदन दिले होते त्यानुसार दिनांक 13 मार्च 2018  राहुल चौदंते यांच्यासह बसपाचे तालुकाध्यक्ष रत्नाकर तारू वांगीकर ,सुमेध सरोदे ,सुमेध  भक्ते ,अनिल तारू , निखिल चौदंते, पत्रकार सिद्धार्थ चौदंते स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष साइराज कदम ,स्वप्नील कांबळे,विजय हावळे,बाळू चौदंते, सिद्धार्थ चौदंते, दिपक वेरुळकर, सचिन चौदंते, सुरज चौदंते, रोशन कांबळे यांच्यासह अनेक लाभार्थी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result