राजू थोरात/सांगली
शेतकऱ्यांची पोलिस ठाण्यात धाव; चौकशी सुरु
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील १६ द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांना तब्बल ४० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्ली येथील एका व्यापाऱ्याने हे कृत्य केले असल्याची व तो पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी तासगाव पोलिसांत दिली आहे.
संबंधीत व्यापारी सध्या सोलापूर येथे राहतो. मणेराजुरी येथे द्राक्ष खरेदीसाठी काही महिन्यांपूर्वी तो आला. त्याने संंबंधीत सोळा शेतकऱ्यांच्या बागेमध्ये जाऊन द्राक्ष पसंत केली. दर ठरवला. प्रत्येक शेतकऱ्याला काही रक्कमही दिली.यामुळे शेतकऱ्यांचा संबंधीत व्यापाऱ्यावर विश्वास बसला. यानंतर व्यापारी पैसे काही दिवसात देण्याचा वायदा करुन सर्व द्राक्षे घेऊन गेला. मात्र यानंतर संबंधीत व्यापाऱ्याने पैसे देण्यास चालढकल करण्यास सुरूवात केली.फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधीत शेतकऱ्यांनी तासगाव पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. याबाबत अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झाला नसून संबंधीत व्यापाऱ्याला लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आश्वासन पोलिस अधिकारी अशोक बनकर ,उमेश दंडीले यानी दिले आहे

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result