- ‘गूढचलनाचा बादशहा’ होण्याकडे वाटचाल सुरु

सिध्दार्थ तायडे 
अकोला: ‘बिटकॉइन’ नावाचे नवे ‘गूढचलन' (क्रिप्टोकरन्सी) सध्या जगभरात गाजत आहे. त्यासारखी इतर अनेक गूढचलने जगात आली आहेत. ही नेमकी काय भानगड आहे, याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला असता, या गूढचलनावर ‘पांडित्य’ स्थापन करण्याच्या प्रयत्नात असणाNया आणि सद्य परिस्थितीत ‘ग्लोबल लिडर’ची पदवी प्राप्त केलेल्या रितेश राठोडसोबत ओळख झाली. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील सुदी या ग्रामीण मातीचा गंध असणा-या, अगदी खेडवळ भागात वास्तव्य असणा-या आणि गरीब कुटुंबात जन्म घेतलेला रितेश आता भारतात गूढचलनाच्या दुनियेचा बादशहा होऊ पाहात आहे. त्या दिशेने त्याची वाटचाल सुरु आहे. 

सध्या अकोल्याच्या डाबकी रोडवरील फडकेनगरात वास्तव्यास असणा-या आणि गीतानगर भागातील एमराल्ड हाईटस् स्कुलमध्ये नववीच्या वर्गात शिकणा-या या १५ वर्षाच्या, अजून ‘मिसुरडं’ ही न फूटलेल्या रितेशला गूढचलनावर (क्रिप्टोकरन्सी) इंग्रजीत फडाफडा बोलताना पाहून कोणीही अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही! त्याच्यामधील ही संवादकला म्हणजे ‘दैवीदेणगी’च असल्याचा प्रत्यय त्याच्याशी वार्तालाप करताना येतो. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी म्हणे, आपल्या मेंदूचा शंभर टक्के वापर करीत असत, त्यामुळे ते प्रगाढ ज्ञानी म्हणून गणले जात. अर्थात रितेश त्या श्रेणीत नसला, तरी आजच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास रितेशचा बुद्ध्यांक इतर सर्वसामान्य मुलांसारखा नाही, त्याने उच्चपातळी गाठली आहे. त्यामुळेच त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर उंच भरारी घेत आपले एक वेगळे नेटवर्क  तयार केले आहे. यासंदर्भात त्याच्याशी संवाद साधताना तो सांगत असलेली माहिती आपल्याला पुढील शतकात घेऊन जाते. सध्या सर्वत्र चर्चा असणा-या ‘कॅशलेस’ पद्धतीची ही पुढची पायरी असल्याचे प्रतीत होते.           

‘गूढचलन’ ही नक्की काय भानगड आहे, ती अस्तित्वात कशी आली, सध्या काय परिस्थिती आहे आणि भविष्यात काय घडू शकेल याचा वेध घेण्यासाठी रितेशला बोलते केल्यावर त्याने सर्वसामान्यांना अचंबित करणारी माहिती दिली. रितेश सांगतो, की डिसेंबर २०१६ मध्ये त्याला असाच मोबाईलवर खेळता-खेळता या क्रिप्टोकरन्सीचा छंद जडला. त्यावेळी तो दक्षिण कोरिया येथील ‘एलसीएफएचसी’ या कम्पनीच्या संपर्कात आला. त्यावेळी त्याच्याही मनात ‘चलन’ म्हणजे काय? ‘गूढचलन’ म्हणजे काय? आयसीओ म्हणजे काय? असे प्रश्न पिंगा घालू लागले. त्या उत्सुकतेपोटी त्याने स्मार्टफोनचा वापर सुरु केला आणि गूढचलनाबद्दलची माहिती जाणून घेण्यास प्रारंभ केला. परंतु त्याचे ज्ञान तोकडे पडत होते. त्यावेळी त्याच्या जीवनात ‘गॉडफादर’ बनून आलेले अमरावती येथील कार्यकारी अभियंता शरद डेहलकर यांच्या मार्गदर्शनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या. त्यांच्या माध्यमातून रितेशचा गूढचलनाच्या दुनियेतील दिग्गज मानल्या जाणाNया सिओनी आहान आणि रॉन वेस्टरप या ‘ग्लोबल लिडर्स’शी परिचय झाला. त्यानंतर अशा धुरिणांची ओळख आणि यादी वाढतच गेली. त्यांच्याशी वार्तालाप करताना रितेशने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे ते अचंबित झाले. गूढचलनासंदर्भात असलेल्या त्याच्या ज्ञानाची त्यांनी केवळ प्रशंसाच केली नाही, तर आता दररोज किमान एकदा त्याच्यासोबत संवाद साधल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसवत नाही. हे माझे सौभाग्यच नव्हे काय? असे रितेश आपल्यालाच विचारतो! गूढचलनाची दुनिया काहीअंशी फसवी वाटत असली तरी सावधानता बाळगल्यास ती इतकी वाईटही नाही, हे रितेश विश्वासाने सांगतो! सध्या या क्षेत्रात भारतातील ‘ग्लोबल लिडर’ म्हणून रितेश जगभरात ओळखला जात असून, ‘एमबीआयटी क्लासिक कॉईन’ या वंâपनीसोबत जुळला आहे कारण ही वंâपनी गूढचलनाची आणि ब्लॉकचेनची वास्तव आणि खरी माहिती देते. या माध्यमातून त्याने आजवर पश्चिम बंगाल, कोलकाता, आसाम, भूतान, बांगलादेश, दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक, भोपाळ येथे आयोजित सेमिनार्सला (चर्चासत्र) हजेरी लावली आहे. आज आपण सर्वजण संगणकाच्या दुनियेत इंटरनेटच्या जाळ्यात अडकले आहोत; मात्र या सोशल मीडियाचा वापर करताना दक्षता घेण्याची गरज आहे. गूढचलनाच्या दुनियेत ‘ब्लॉकचेन’ ही सुरक्षा प्रदान करणारी यंत्रणा आहे, असे सांगतानाच, आपल्याला भविष्यात गूढचलन आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणारा जगप्रसिद्ध व्यक्ती बनायची इच्छा आहे, यासाठी आपल्याला सदोदित सहकार्य करणारे जंगल कामगार सोसायटीचे सचिव असणारे वडील रामेश्वर, काळजी वाहणारी आई देवकी आणि पाठबळ देणाNया तीन बहिणी, आपले गॉडफादर शरद डेहलकर यांचा मी ऋणी आहे आणि सदैव राहीन, असेही रितेश अभिमानाने सांगतो. 

आपण एखाद्या दुकानात जाऊन काही कागदांच्या तुकड्यांच्या मोबदल्यात (सरकारी मान्यता असणाNया चलनी नोटा) हव्या त्या वस्तू घेतो. डिजिटल युगात या नोटांचे महत्त्व कमी होत चालले आहे आणि भविष्यात आणखी कमी होणार आहे. दुकानातून वस्तू विकत घेतल्यावर तिथे डेबिट/क्रेडिट कार्ड स्वाइप करता येते. वस्तू आपण घरी घेऊन येतो आणि ‘पैसा' हा आपल्या व्हर्चुअल बँक अकाउंटमधून दुकानदाराच्या व्हर्चुअल बँक अकाउंटमध्ये जातो. प्रत्यक्ष चलन हस्तांतरित न होताही हा व्यवहार होतो. कारण डिजिटल चलन आणि बँक व्यवस्थेवर आपला विश्वास असतो आणि त्यांना सरकारी पाठबळ असते. गेली काही हजार वर्षे जगभरात सर्वत्र, व्यवहारासाठी उपयुक्त अशी चलने, आधी राजे-रजवाडे आणि नंतर सार्वभौम देशांच्या सरकारांनी व्यवहारात आणली आहेत. सध्याही प्रत्येक देशाचे स्वत:चे चलन असून, त्यावर त्या-त्या देशाच्या सरकारचे पूर्ण नियंत्रण असते. या संपूर्ण संकल्पनेला छेद देणारी नवी ‘गूढचलने' जगात आली आहेत. ही कोणत्या एका देशाच्या सरकारने तयार केलेली चलने नसून, ती अत्यंत क्लिष्ट सॉफ्टवेअरने तयार केलेली चलने आहेत. त्यावर कोणा एकाची मालकी नसून, ती चलने वापरणा-या सगळ्यांच्या मालकीची आहेत आणि त्यांचा वापर आणि दर हा कोणी एक सरकार ठरवीत नसून, एकूण सर्व वापरकत्र्यांचा विश्वास, मागणी आणि पुरवठा यावर आपोआप ठरला जात आहे. व्यवहार, चलन आणि पैशाचे हे कदाचित भविष्य आहे. प्रत्येक देशाचे सरकार आपापल्या देशाच्या चलनी नोटा छापते. ते-ते चलन त्या-त्या देशात लीगल टेंडर असते आणि साधे कागदी तुकडे असूनही ते देशातील सर्व व्यवहारांसाठी वापरले जातात. बिटकॉइन्स हे मात्र कोणी एक सरकार, कंपनी, संस्था किंवा व्यक्ती तयार करीत नाही. ते चलन कोणाच्याच मालकीचे नाही. कोणा एकाचे त्यावर नियंत्रण नाही. ते चलन वापरणा-या सर्व ‘नेटवर्क'च्या मालकीचे आहे. बिटकॉइन हे मुक्तस्रोत (ओपन सोर्स) सॉफ्टवेअरमधून तयार होणारे आणि वापरता येऊ शकणारे चलन आहे. बिटकॉइन संबंधित साफ्टवेअर्स वापरून ‘नेटवर्क'साठी ठराविक कामे करणाNया लोकांना नवी बिटकॉइन्स मिळतात. या कामाचे मुख्य स्वरूप काही अत्यंत क्लिष्ट गणिताचे प्रश्न सोडविण्यासारखे असते. गणिते वगैरे सोडवून चलन (करन्सी) मिळेल असे लहानपणी कोणी सांगितले असते, तर निदान पाढे तरी पाठ केले असते! अर्थात ती अत्यंत क्लिष्ट गणिते सोडवायचा प्रयत्न करणारीही सॉफ्टवेअर्स असतात आणि ती आपल्याला आपल्या कॉम्प्युटरवर चालवत ठेवायची असतात. याला बिटकॉइनचे ‘खाणकाम’ (मायनिंग) म्हणतात. हे मायनिंग करीत-करीत काही ठराविक गणिती कोडे सोडविले, की ते सोडविणाNयाला ठराविक बिटकॉइन्स मिळतात. ही गणिती कोडी सहज गंमत म्हणून घातलेली कोडी नसून, ती कोडी सोडविल्याने बिटकॉइनचे व्यवहार अधिकाधिक सुरक्षित होत असतात आणि गंमत म्हणजे आधीची कोडी सुटली की येणारी नवी कोडी जास्त-जास्त क्लिष्ट बनत जातात. पण अशी अनंत कोडी सोडवत राहून अमर्याद बिटकॉइन्स तयार होणार नाहीत, कारण जगात एकूण किती बिटकॉइन्स तयार होणार यावर मर्यादा आहे तसेच दर महिन्याला आणि वर्षाला किती नवी बिटकॉइन्स तयार होणार यावरही मर्यादा आहेच. त्याची सुरुवात ज्यांनी केली, त्या डेव्हलपर्सनी दोन्ही मर्यादा आखून देऊन सॉफ्टवेअरमध्येच अंतर्भूत केल्या आहेत. जगातील सर्व डेव्हलपर्सनी आणि सर्व नेटवर्कनी मान्य केल्याशिवाय यात बदल होणार नाही. तर अशी आहे, ही गूढचलनाची दुनिया! या दुनियेत अगदी आरामशीरपणे वावरणाNया रितेशच्या बुद्धिमत्तेला खरोखरीच तोड नाही!

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result