मोरेश्वर सुरवाडे, जळगांव

जळगांव- माजी मंत्री आ.एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी प्रकरणी नगरसेवक सुधाकर धनगर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्या करीता मंगळवारी ४ वाजता लेवा समाजाने मूक मोर्चा काढला. प्रशासनाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत आणि घटनेचा निषेध करत यावल तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. याबाबत अधिक वृत्त असे की माजी मंत्री आ. एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची त्यात खासदार रक्षाताई खडसे व जिल्हा बॅकेच्या अध्यक्षा अॅड रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या बदनामी करण्याच्या उद्देशाने यावल येथील नगरसेवक सुधाकर धनगर यांनी एक क्लिप तयार केली व महिला दिनाच्या दिवशी अशा प्रकारचे कृत्य केल्याच्या निषेधार्थ यावल शहरातील लेवा पाटील समाजाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी ४ वाजेला शहरातुन मूक मोर्चा काढण्यात आला आणि यावल तहसिलदार कुंदन हिरे यांना नगरसेवक सुधाकर धनगर यांच्यावर कठोर कारवाई तसेच हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून तात्काळ कारवाई न झाल्यास लेवा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी नगरसेवक राकेश कोलते, नगरसेविका देवयानी महाजन, पोर्णिमा फालक, प्रमोद नेेमाडे, लेवा समाजचे अध्यक्ष सलील महाजन, बाळू फेगडे, धीरज महाजन, जिल्हा परिषदचे माजी सदस्य हर्षल पाटील, राजेश करांडे, यश पाटील, पराग बोरोले, जगदिश करांडे, प्रकाश महाजन, सविता फेगडे, हेमराज फेगडे, नितिन महाजन सह मोठ्या संख्येत लेवा समाजातील महिला व पुरूष सहभागी झाले होते. यावल शहरातील भुसावळ रस्त्यापासुन ते थेट तहसिल कार्यालया पर्यंत मूक मोर्चा काढत तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result