मनिष ओव्हाळ 
देहूरोड:- बी के बिर्ला सेंटर फाॅर एज्युकेशन शिरगाव येथे आयोजित डीडीए क्रिकेट स्पर्धेत एकुण सोळा संघ सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड देहूरोड मावळ भोसरी आळंदी चाकण परिसरातील डाॅक्टरांच्या संघानी यात सहभाग घेतला होता,
स्पर्धेचे बक्षिस वितरण डीडीए चे विदयमान अध्यक्ष डाॅ संदीप सांडभोर ,बिर्ला स्कुलचे प्राचार्य डाॅ एस के सन्याल ,क्रीडा विभाग प्रमुख श्री नागेश्वर राव यांच्या हस्ते झाले , सलग दोन दिवस खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत सर्वच संघानी नेञदीपक कामगिरी केली , मालिकावीर म्हणुन स्टार संघाच्या डाॅ अविनाश गावडे तर उत्कृष्ट फलंदाज डाॅ  संदीप नरवडे  तसेच उत्कृष्ट गोलंदाज डाॅ महेश भोर यांची निवड झाली , अंतिम सामन्यात  राॅयल क्रिकेट क्लबच्या 10 षटकात 64 धावांचे आव्हान स्टार संघाने आठ गडी आणि चार षटके राखुन सहज पार केले, यात डाॅ गावडे यांची 19चेंडुत 42 धावंची खेळी निर्णायक ठरली , विजेत्या संघाच्या डाॅ अक्षय डाॅ श्रीकांत डाॅ राहुल, डाॅ तुषार यांची भेदक मा-यामुळे राॅयल संघ 64 धावांवर आटोपला, स्टार यष्टीरक्षक डाॅ प्रमोद कुबडे यांनी एकुण स्पर्धेत १२गडी बाद केले एबीसीडी,अॅनेस्थेशिया टीम,एओ क्रिकेट क्लब, सीडीसीसी,डीसीए, डीडीए ,एन्जाॅय,एमडीए,सांगवी, सेवाधाम ,प्रेशिडेंशीयल वाॅरिअर,एफ़पीए ,या संघांनी भाग घेतला होता, 
या स्पर्धेचे नियोजन डीडीए स्पोर्ट्स कमिटीचे चेअरमन डाॅ सोनाजी गावडे  ,उपाध्यक्ष डाॅ  महेश कुदळे ,डाॅ निलेश लोळगे , डाॅ पाटील,डाॅ रसाळ ,खजिनदार डाॅ  किशोर नाईकरे, यांनी केले, तसेच जेष्ठ सदस्य डाॅ बन्सल डाॅ चवात ,डाॅ चौधरी , डाॅ येळवंडे, डाॅ ओसवाल, डाॅ गलांडे ,डाॅ जाधव, डाॅ गुंजाळ डाॅ टकले ,डाॅ धारस्कर डाॅ सुनिल मुदगडे , डाॅ गणेश राऊत डाॅ मोहित गोयल यांनीही खेळाचा आनंद लुटला , डाॅक्टरांच्या आरोग्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात देहूरोड डाॅक्टर्स असोसिएशन नेहमीच अग्रेसर असतें ,यापुर्वी स्नेहसंमेलनात धन्वंतरी पुरस्काराने डाॅ रमेश कुलकर्णी सर,डाॅ केदार  भाटेसर तसेच डाॅ त्र्यंबक वाघचौरे सर यांना गौरवण्यात आले होते , या क्रिकेट स्पर्धेचे सूञसंचालन डाॅ भुषण कुलकर्णी व डाॅ राज चवात सर यांनी तर आभार प्रदर्शन डीडीए अध्यक्ष  डाॅ संदीप सांडभोर यांनी केले,

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result