'वाशिम दि.०६:(अजय ढवळे) येत्या ५ एप्रिल २०१८ रोजी स्थानिक वाटाणे लॉन अकोला रोड वाशिम येथे तमाम महाराष्ट्रातील एचआयव्ही बाधित विध्यार्थ्याच्या विकास व आर्थिक मदती साठी चेतनकुमार प्रस्तुत "मिस क्वीन'' अर्थात सौन्दर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,या स्पर्धेचे प्रवेश शुल्क समाजातील एच आयव्ही बाधित विध्यार्थ्यांच्या विकासासाठी खर्च होणार आहे,अशी माहिती स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेत आयोजक चेतनकुमार इंगळे यांनी दिली.या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातील युवती भाग घेऊ शकतात,सदर स्पर्धेच्या अटी व नियम स्पर्धकाला वेळेवर सांगण्यात येतील,सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी सौन्दर्य स्पर्धा कार्यालय ,जाधव कॉम्प्लेक्स राजस्थान कॉलेज जवळ,वाशिम येथील संपर्क कार्यालयात संपर्क साधावा आथवा 9552348243/ 8805194248 या क्रमांकावर संपर्क करावा , सदर मिस क्वीन  स्पर्धेला पर्यवेक्षक म्हणून जेष्ठ सिने अभिनेते आशीकी फेम राहुल रॉय,जेष्ठ सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर,मराठी चित्रपट निर्माते/दिर्गदर्शका शिल्पा पाटील,नवीन चित्रपट मोर्चा फेम गौरी कदम,आवाज इंडिया टी वि चे अँकर विक्रमकुमार यांच्या सह विनिध मान्यवर उपस्थित राहणार आहेत,तरी या सौन्दर्य स्पर्धेमध्ये वाशिम जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सौदर्यवतीनी युवतींनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक चेतनकुमार इंगळे,माही जोशी,आरती शर्मा,आकाश कुमार,अतुल कुमार अमोल कुमार यांनी केले आहे.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result