महावाईस ब्यूरो - 
 
      कोलकत्ता इलेक्ट्रिक सप्लाय कार्पोरेशनच्यावतीने आयोजित ४२ व्या अखिल  भारतीय  विदुयत क्रीडा नियंत्रण मंडळ क्रिकेट स्पर्धेसाठी महानिर्मितीचा संघ जाहीर करण्यात आला आहे. याकरिता, बालाजी फड यांच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. नुकतेच महानिर्मितीचा क्रिकेट संघ कोलकात्यात  दाखल झाला आहे.  ही  स्पर्धा कोलकत्ता येथे ५ ते ८ मार्च दरम्यान होणार आहे. प्रत्येकी २० षटकांचे नॉक आऊट पद्धतीचे हे राष्ट्रीय सामने अत्यंत चुरशीचे होणार आहेत.
                 
      महानिर्मितीच्या संघात संदीप भोयर,अक्षय वैशंपायन,नवल दामले,पवन कुमावत,बालाजी फड(कर्णधार),रत्नाकर देवांग,मनोज जमदाडे,कुणाल काळभुत,स्वप्नील पाटील,सुरेश वरणकर, संदीप वाघ,तेजस पाटील,विनोद भिरुड,संजय निमजे,सचिन सातारकर, धीरज सोनावणे  आदी खेळाडूंचा समावेश आहे. 
 
आनंद वाघमारे(संघ व्यवस्थापक) व  साहेबराव निकाळजे(संघ प्रशिक्षक) म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सर्व संचालक, कार्यकारी संचालक व मुख्य अभियंते, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांनी स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result