चंद्रपुर - डॉक्टर म्हटले की अभ्यास, प्रैक्टिस  रुगणांना पाहता पाहता दिवस कसा जातो  हेच त्याला कळत नाही.. दिवस भर रुगणांना रोग बर करण्या करीता औषधि लिहून लिहून हात थकनारा व्यक्ति म्हणजे डॉक्टर . मात्र यावर अपवाद ठरला तो चंद्रपुरचा डॉक्टर विशवास झाड़े. यां डॉक्टरने 25 फेब्रूवारी 2018 ची कोलंबो येथील"  आयरन मेन " चा खिताब जिंकून सगळ्याचे होश उडविले आहे... व श्रीलंकेत झालेल्या आयरन मेन स्पर्धेत भारतांचा तिरंगा फडकवला आहे. डॉक्टर विशवास झाड़े यांचा डॉक्टर ते आयरन मेन चा प्रवास  महावाईस वर.

 


विदर्भाच्या चंद्रपुरात 17 वर्षा पासून प्रैक्टिस करणारे 47 वर्षीय हे आहे डॉक्टर विशवास झाड़े. आपल्या डॉक्टरी अभ्यासात त्यांनी मेडिसिन एमडी कोर्स करून ते ह्रुदयरोग तज्ञ झाले. विशवास नाव असलेल्या  डॉक्टर विशवास झाड़े वर रुगणांनचा ही भरभरून विश्वास आहे. त्या मुळे रुगनांणा बघता बघता दिवस कसा जायचा हेच त्याना कळत नव्हता.अश्यातच 40 वर्ष पार केल्या नंतर स्वता डॉक्टर अस्तानां त्यांना बीपी व शुगर आजाराने जकडले.

 

मात्र दुसरयाना औषधिच्या माध्यामातून जीवन देणारे  डॉक्टर विशवास झाड़े यांनी मि बीपी व शुगर चे गोळ्या खानार नाही. असा निर्णय घेतला . व तिथुनच एक डॉक्टर बनला  " आयरन मेन " बघुया काय म्हणतात डॉक्टर विश्वास झाड़े.......

 


बीपी व शुगर  झाल्या मुळे डॉक्टर विशवास झाड़े यांनी रनिंग ला सुरुवात केली आपला 80 किलो वजन घेवून रनिंग करने सुरुवातीला कठिन होता . मात्र मनात गोळ्या न खाण्याची जिद्द व रोग मुक्त होण्याचा संकल्प घेवून त्यांनी पहिले हॉफ मैराथान स्पर्धेत  हैदराबाद येथे भाग घेतला.अडीच तासाची ही पूर्ण केली. त्यानंतर नागपुर,गोवा,मुंबई व लदाख सारख्या शहरात आपला ठसा उमटवला.. व बीपी आणि मधुमेह सारख्या रोगाना मुढ़ा पासून नष्ट करीत  डॉक्टर वीशवास झाड़ेच्या  मनात लोह पुरुष बंण्याची इच्छा जागृत झाली. आणी 25 फेब्रूवारी 2018 रोजी श्रीलंका येथील कोलंबो येथे झालेल्या " आयरन मेन " साढे आठ तासाची स्पर्धा आठ तासात पूर्ण करुण भरताच्या तिरंगा ऊंच करत डॉक्टर विशवास झाड़े " आयरन मेन " बनला.... आयरन मेन बनत असल्याचा तो क्षण झाड़े परिवार बघून  आनंदाने फुलत होता.

 

 

झाड़े परिवार ला विश्वासच बसत नव्हता की साढे आठ तासाची स्पर्धा विशवास जिंकनार की नाही  मात्र नावात विशवास असलेल्या डॉक्टर विशवास झाड़े ने ही स्पर्धा जिंकून दाखविली . याचा मला अभिमान असल्याचा सौ. नंदाली विश्वास झाड़े म्हणालय.

 


चंद्रपुर चा ह्रुदयरोग तज्ञ डॉक्टर श्रीलंकेत जावून आयरन मेन झाला .  यांची माहिती होताच चंद्रपुरात आनंदाचे वातावरण पसरले .  चंद्रपुर जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे  यांनी  तर त्यांच्या कामगिरी वर जिल्हा परिषद क्षेत्रातील विद्यार्थ्याना खेळात भर देण्या साठी त्यांचा उपयोग करण्याची माहिती  महावाईस ला दिली.

गोळ्या न खण्याची जिद्दी  ने आज डॉक्टर विशवास झाड़े आयरन मेन बनले आहे. यांचा महाराष्ट्र पासून तेलंगाना प्रयन्त सर्व कौतुक होत आहे.

 

डॉक्टर म्हणजे रुगणांना औषधि देने गरजे आहे. परंतु स्वताला झालेल्या रोगाला दूर करण्या साठी औषधि न घेता स्पोर्ट कड़े वळणाऱ्या डॉक्टर विशवास झाड़े यांच्या जिद्दीला महवाईसचा सलाम .हळू हळू स्पोर्ट कड़े वळत पाच मैरोथान मध्ये भाग घेवून आता कोलंबो येथे झालेल्या आयरन मेन चा खिताब जिंकला आहे. डॉक्टर विशवास झाड़े सारखी जिद्द राज्यातील प्रत्येक माणसाने मनात आनली तर नक्कीच निरोगी जीवन जगता  येईल.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result