महाव्हॉईस प्रतिनिधी
मुंबई : मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून एका तरूणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.  मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून या तरूणाने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. हर्षल रावते असं या तरूणाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.

तरूणाच्या प्रकृतीबाबत अजून संभ्रम असून त्याला मुंबईच्या सेंट जॉर्ज रूग्णालयात नेण्यात आलं आहे.  त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत अजून नेमकी माहिती मिळालेली नाही. दरम्यान, शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर बुधवारी एका तरुणाने मंत्रालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले होते त्यानंतर ही आणखी एक घटना घडली आहे.
 

Comment


अँट्राँसिटी कायदा असावा का ?


Result