मोरेश्वर सुरवाडे, जळगांव

जळगांव- मुक्ताईनगर तालुक्यातील पिप्रीनांदू नदीपात्रात बोटीद्वारे सेक्शन पंपाद्वारा अवैध वाळू उपसा महसुल प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे होत आहे यावर तात्काळ कारवाई व्हावी याकरीता आज मंगळवारी शिवसेनेने पिप्रीनांदू येथील नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले. जळगांव शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ३०० ते ३५० शिवसैनिक जलसमाधी घेण्यासाठी नदीपात्रात उतरले. मुक्ताईनगर नायब तहसिलदारांनी सदर उपशासंदर्भात कारवाईचे लिखित स्वरुपात आश्वासन दिले त्यानंतर जलसमाधी आंदोलन थांबविण्यात आले. या ठिकाणी उपसा करणारी बोट आणि पोकलैंड सिल करण्याची कारवाई आता सुरु असून संबंधित मक्तेदारावर गुन्हा नोंदविण्याचे आश्वासन महसूल प्रशासनाने दिले. मुक्ताईनगर तालुक्यातील पिप्रीनांदू येथील नदीपात्रात मागील काळात बोटीद्वारे सेक्शन पाईपद्वारे अवैध वाळू उपसा सुरु असतांना यावर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी दि १८ व २५ जानेवारी ला निवेदन देत कारवाईची मागणी केली होती व याबाबतीत तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन देखील करण्यात आले होते. परंतु जवळपास दोन महिने उलटूनही महसुल प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. उलट एका लोकप्रतिनिधीच्या वरद हस्ताने पुन्हा बोटीद्वारे सेक्शन पाईपच्या सहाय्याने अवैधरीत्या वाळूचा उपसा सुरु असुन याकडे महसुल प्रशासन अर्थपूर्ण किंवा राजकीय दबावापोटी सपशेल दुर्लक्ष करीत होते. सुरु असलेले अवैध वाळू उपशाची चित्रफित व पुरावे देऊनही कुठलीच कारवाई झालेली नसल्याने तहसिलदारांसह महसुल प्रशासनाचे लागेबंध या अवैध वाळू उपशाबाबत दिसुन येत होते. असा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात येत होता. त्यामुळे शिवसेनेच्या संयमाचा बांध सुटत शिवसेनेतर्फे आज मंगळवारी जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result