शाळा बंद विरोधात रस्त्यांवर याल तर याद राखा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची समितीच्या सदस्यांना धमकी 
 

शिक्षण वाचवा नागरी कृती समितीने पत्रकार परिषद दिली माहिती

अभिजीत पाटील


कोल्हापूर- . महाराष्ट्रातील शाळांचे कंपनीकरन करण्याच्या शासन निर्णयाविरोधात शिक्षण वाचवा नागरी कृती समिती गेली काही महिन्यापासून आंदोलन करीत आहे. मात्र हे आंदोलन दडपण्याच्या प्रयत्न पालकमंत्री चंद्रकांत पाटील करीत असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केलाय. मंगळवारी शाळांच्या समोर होणार परिपाठ आंदोलन करू नये याकरिता, समितीच्या सदस्यांना पोलिस प्रशासनान नोटीस देखील बजावल्या आहेत. मात्र अशा नोटीसाना समितीची सदस्य भिक घालणार नसून उद्या (ता१३) मंगळवारी करण्यात येणार आंदोलन हे होणारच आहे, असही शिक्षण वाचवा नागरी कृती समितीन स्पष्ट केल आहे. 

 


 

महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद करून त्यांच कंपनीकरण करण्याचा निर्णय शासनान घेतलाय. या निर्णयाला विरोध करून सर्वसामान्यांचं शिक्षण वाचविण्यासाठी शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्यावतीन गेली काही महिन्यापासून विविध मार्गाने आंदोलन सुरु आहे. मात्र हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील करीत आहेत. असा आरोप या समितीच्या सदस्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केलाय. शिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे सदस्य अशोक पवार यांना, मी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा भाचा आहे तुम्हाला आंदोलना संदर्भात भेटायचे आहे, असे सांगून रविवारी काही लोक भेटायला त्यांच्या घरी आले होते. यामध्ये के.के.पाटील यांनी आपण मुख्याध्यापक असल्याच सांगून अशोक पवार यांना आंदोलानाच्या संदर्भाने काही प्रश्न केले. याचवेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मी भाचा आहे, म्हणणाऱ्या व्यक्तीने पालकमंत्री पाटील यांना फोन जोडून दिला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अशोक पवार यांना उद्देशून कसले आंदोलन करता, अशी आंदोलने बंद करा, शाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्यांवर घ्याल तर याद राखा अशा शब्दात धमकी दिल्याचा आरोप अशोक पवार यांनी पत्रकार परिषदेत केलाय. विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी रस्त्यावर घेवू नये याबाबतचा आदेश काढण्याबाबत आपण शिक्षांणाधीकाऱ्याना आदेश दिल्याचही यावेळी पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी फोन वरून सांगितल्याच, अशोक पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितल. राजश्री शाहुनी ज्या जिल्ह्यात शिक्षणाची सक्ती केली त्यांच्याच जिल्ह्यात शिक्षण वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या सदस्यांना अशा प्रकारे पालकमंत्री चंद्रकात पाटील धमकी देत असल्यान त्यांच्याबद्दल यावेळी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे
दरम्यान,आज मंगळवारी 11 वाजता,  पालक आपल्या पाल्याच्या समवेत शाळे समोर सामुदायिक परिपाठ आंदोलन करणार आहेत. मात्र कृती समितीच्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सहभागी होवू नये याकरिता रविवारी सुट्टीच्या दिवशी शिक्षणाधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करून परिपत्रक काढल असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. शिवाय शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या सदस्यांना देखील  पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. मात्र उद्या मंगळवारी होणार शाळासमोरच परिपाठ आंदोलन हे होणारच आहे. अस देखील यावेळी समितीच्या वतीन पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलय. यावेळी भरत रसाळे, राजेश वरक. गणी आजरेकर, रमेश मोरे, लाला गायकवाड, किशोर घाडगे, संजय पवार-वाईकर सुधाकर सावंत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result