मिलिंद खोंड 
 
 रायपूर :  छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २१२ व्या बटालयनचे ८ जवान शहीद झाले  असून  सहा जवान जखमी झाले आहेत. यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे.
सुकमा जिल्ह्यातील किस्तराम परिसरातून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २१२ व्या बटालयनचे जवान जात होते. यादरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडीद्वारे स्फोट घडवला. या स्फोटात आठ जवान घटनास्थळीच शहीद झाले. तर सहा जवान गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

 


तेलंगण सीमेवर छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात २ मार्च रोजी सुरक्षा दलांनी माओवाद्यांवर कारवाई केली होती. या चकमकीत १० माओवादी ठार झाले. तर एक जवान शहीद झाला होता.

 

माओवाद्यांच्या कॅम्पवर त्यांचे मोठे नेते असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी पुजारीकंकर जंगलात घुसून कारवाई करत माओवाद्यांना दणका दिला होता. या कारवाईचा बदला घेण्यासाठी माओवाद्यांनी जगदलपूरवरुन हैदराबादकडे जाणाऱ्या महामार्गावरही गेल्या आठवड्यात धुमाकूळ घातला होता.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result