नवी दिल्ली - लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या 'जनसंवाद' या पुस्तकाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता 'जनसंवाद' या पुस्तकाचा गुजराती भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. 

पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणा-या डॉ. गायकवाड यांनी सामाजिक क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला. पत्रकार, समाजसेवक आणि खासदार अशा प्रवासातून आलेले अनुभव आणि पत्रकारितेचे विद्यार्थी असलेल्या खासदार डॉ. गायकवाड यांनी या एकूणच प्रवासावर आधारित 'जनसंवाद' हे पुस्तक मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहून प्रकाशित केले होते.

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हे पुस्तक इतर प्रादेशिक भाषेत अनुवाद करण्याची सूचना खा. डॉ. गायकवाड यांना केली होती. त्यानुसार आता 'जनसंवाद' हे पुस्तक गुजराती भाषेत अनुवादित झाले आहे. भविष्यात इतर प्रादेशिक भाषांमध्येही 'जनसंवाद' अनुवादित होणार आहे, अशी माहिती खा. डॉ. गायकवाड यांनी दिली. 

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result