महेंद्र गायकवाड 


नांदेड - भीमकोरेगाव प्रकरणाची दंगल प्रकाश आंबेडकर आणि संभाजी ब्रिगेड मुळे नियंत्रणात आली. संविधान बदलण्याचा डाव चालू असून , भाजपने ही संविधान मानावे असा माझा आग्रह आहे. संविधानला नख लावणारा प्रत्येक जन माझा विरोधी असल्याचे मत जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सिडको नांदेड युवा ग्रुप च्या सतीश बसवदे यांनी शिवरायांचे स्वराज व आजची परिस्थिती या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले होते या वेळी निखिल वागळे बोलत होते.. महापुरुषच्या पुतळ्या पलीकडचा महाराष्ट्र मला शोधायाचा आहे,  शिवरायांची लढाई ही साम्राज्य विरोधी होती , ती मुस्लिम धर्मा विरोधी नव्हती पण आजचे हे महाराष्ट्रा सरकार शिवरायांच्या विचाराचे पाईक नाहीत असे मत या वेळी निखिल वागळे यांनी मांडले या कार्यक्रमाचे उदघाटन मनपा उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या हस्ते झाले ,या वेळी संतोष पांडागळे किशोर स्वामी,डॉ. श्याम तेलंग ,पप्पू कोंडेकर, रमेश गोडबोले, मंगलाताई देशमुख,सिद्धार्थ गायकवाड ,उदय देशमुख. आंबेडकरवादी मिशन प्रमुख दीपक कदम सर ,इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार जयवर्धन भोसीकर, तिरुपती बसवदे, प्रा.अविनाश नाईक, इंजि सोनकांबळे , साहेबराव मामीलवाड, शेर अली खान , व सिडको ,हडको परिसरातील जन समुदाय मोठ्या प्रमाणात उपस्तिथ होता..

Comment


अँट्राँसिटी कायदा असावा का ?


Result