भाजप कामगार आघाडीच्या जयस्वाल यांची कामगार मंत्र्यांकडे तक्रार

अहवाल सादर करण्याचे कामगार मंत्र्यांचे उपायुक्तांना  आदेश

मुंबई : मूळची दुबई येथील असलेल्या अल फराह इन्फ्रा ग्रुप अँड कन्स्ट्रक्शन कंपनीने मुंबईतील २०५ कामगार तसेच ९ कंत्राटदारांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून सुमारे 63 लाख रुपये देण्यास टाळाटाळ करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ही कंपनी कामगारांना पैसे न देण्याचे षडयंत्र रचत असून कामगार कायदा पायदळी तुडवत असल्याची तक्रार अखिल भारतीय ठेकेदार संघ व भाजपा कामगार आघाडीचे महाराष्ट्र सचिव राजकुमार जयस्वाल यांनी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची निलंगेकर यांनी तत्काळ दाखल घेत कामगार उपायुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

सविस्तर माहितीनुसार , नवघर पूर्व मुलुंड येथे टाटा अवेझा कंपनीतर्फे एका व्यावसायिक इमारतीचे बांधकाम सुरू आहेत. टाटा आवेझा कंपनीने मूळची दुबई येथील अल फराह इन्फ्रा या कंपनीला कामगार पुरवठा करण्यासाठी कंत्राट दिला होता तसेच या कंपनीने त्यानुसार कामगार पुरवठा केला होता. अल फराह इन्फ्रा या कामगार कंत्राटदार कंपनीची मुदत एक वर्षांपूर्वी संपली मात्र तरीही या कंपनीने २०५ कामगार तसेच ९ कंत्राटदार यांना आपल्या कामाचा मोबदला दिलाच नाही. हे सर्व कामगार आणि कंत्राटदार नोंदणीकृत असूनही अल्फ्र इन्फ्र कंपनी कामगार आणि कंत्राटदारांना पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. तसेच काम केल्याचा मोबदला कधी देणार याचा जाब विचारण्यासाठी हे कामगार टाटा अवेझा कंपनीकडे गेले अवेझाचे व्यवस्थापक शरद कुलकर्णी यांनी आम्ही सदर कंत्राटदाराला पैसे दिल्याचे सांगितले. मात्र अल फराह इन्फ्रा कंत्राटदाराने कामगारांना पैसे दिलेच नाही , हे कामगार याचा जाब विचारण्यासाठी गेले असता अल फराह इन्फ्रा कंपनीने त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन मानसिक खच्चीकरण करीत असल्याचे  कामगार मंत्री नीलेंगेकर यांना दिलेल्या तक्रारीत राजकुमार जयस्वाल यांनी म्हटले आहे. तरी या कामगारांना तत्काळ न्याय मिळवून देत अल फराह इन्फ्रा कंपनी व त्याच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जयस्वाल यांनी निलंगेकर यांच्याकडे केली आहे.

फंड नसल्याचा कंपनीचा बनाव

अल फराह इन्फ्रा कंपनीकडे राजकुमार जयस्वाल यांनी कामगारांच्या देणी बाबत विचारणा केली असता कंपनीचे मालक नितेश गंगारामाणी व तेथील कर्मचारी अश्फाक मुल्ला, विशाल आस्वाणी याने सांगितले की, “सध्या आमच्याकडे कामगारांना देण्यासाठी फंड नाही , जेव्हा फंड येणार तेव्हा पैसे देणार” मात्र कंपनीने पुणे येथे नवीन प्रकल्पाचा कंत्राट घेतला आहे. त्यासाठी कंपनीकडे कुठून फंड आला ? असा सवाल जयस्वाल यांनी करीत अल फराह इन्फ्रा मागील ३ वर्षापासून फंड नसल्याचा बनाव करून कामगारांचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे म्हटले आहे. 

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result