मल्याळी दिग्दर्शक ओमार लुलू यांच्या ओरू अडार लव्ह या चित्रपटात एक माणिक्या मताराया पुवी नावाचे गाणे आहे. या गाण्यात दोन अल्पवयीन मुलांची प्रेमकहाणी फुलते. यातील नायिकेचं काम करणाऱ्या प्रिया प्रकाश वॉरिअर नावाच्या नायिकेने डोळ्यांतूनच आपले प्रेम व्यक्त केले आहे. तर नायकाचे काम करणाऱ्या रोषन अब्दुल रऊफने कमालीचा लाजाळूपणा दाखवला आहे. या दोघांतल्या नेत्रपल्लवीनी समाजमाध्यमावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विशेषतः प्रिया प्रकाश वॉरिअरच्या नेत्रपल्लवीला तर डोक्यावर घेतलंय. तिच्या युट्यूबवरील व्हिडीओला 80 लाख प्रेक्षकांनी बघितलंय, ईन्स्टाग्रॅमवर तर ही संख्या रोजच वाढतीये. एवढच नाही तर व्हॉटस्ऍपच्या माध्यमातून हा व्हीडीओ देशभरात प्रसारित झाला आहे. 


या व्हिडीओतल्या प्रियाच्या नेत्रपल्लवीची जगभरात प्रशंसा होतेय. मात्र याच व्हीडीओमध्ये तेवढ्याच तोडीची नेत्रपल्लवी करणाऱ्या आणि भूवया नाचवणाऱ्या रोषन अब्दुल रऊफच्या वाट्याला तशी प्रसिध्दी आली नाही. नेटीझन्सच्या या पूर्वग्रहदुषीत धोरणाचा ऱोषनला चांगलाच फटका बसला आहे. 
रोषन तसा मल्याळी प्रेक्षकांसाठी नवीन नाही. त्याने आपल्या पदलालित्याने एका मल्याळी चॅनलच्या डान्स रिऍलिटी शोमध्ये आपल्या कलेची छाप सोडली आहे. या शोद्वारेच त्याचे नाव घरोघरी लोकप्रिय झाले होते. त्याने ड्वाएन ‘द रॉक’ जॉन्सनच्या स्टाईलने भूवया उंचावून या गाण्यात प्रेक्षकांवर छाप पाडली, तसेच नेटीझन्सलाही वेडे केले. त्याच्या वाट्याला प्रिया वॉरिअर प्रमाणे प्रसिध्दी आली नाही याची त्याला खंत नाही. एका मुलाखतीत तो म्हणतो की नेटीझन्सच्या पूर्वग्रहदुषीत दृष्टीकोनापेक्षा त्याला त्याचे करिअर महत्त्वाचे वाटते. 


या चित्रपटात संधी मिळावी म्हणून त्याने ओमर लुलू या प्रसिध्द मल्याळी दिग्दर्शकाचा पिच्छा पुरवला होता. शेवटी त्याच्या ससेमिऱ्याला कंटाळून लुलू यांनी त्याला ओरू अडार लव्ह या चित्रपटात संधी दिली. रोषन म्हणतो “चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी लुलू यांनी अचानक आम्हाला भूवया उंचावता येतात का असा प्रश्न केला. हा प्रश्न अगदी उत्स्फूर्त होता. त्यांना अचानक सुचलेला. आम्ही त्यांनी आमच्या भूवा उंचावून दाखवल्या. हा एवढासा सिक्वेन्स ईतका लोकप्रिय होईल असं आम्हाला किंवा अगदी लुलू यांनाही त्यावेळी वाटलं नव्हतं”.

 


आश्चर्य म्हणजे अशा प्रकारची नेत्रपल्लवी त्याने त्याच्या खऱ्या आयुष्यात कोणत्याही मुलीसोबत केली नव्हती.  एका अल्पवयीन प्रियकराची भूमिका पार पाडणे त्याच्यासाठी खूप कठीण असल्याचे मुलाखतीदरम्यान आढळून आले. तो अशा लव्हरबॉयच्या भूमिकेसाठी बनलेला नाही असेच वाटते. तरीही त्याने आपल्या नेत्रपल्लवीने आपल्या अल्पवयीन प्रेमिकेवर जादू करून पडद्यावर तिचे मन जिंकले होते.
रोषन अब्दुल रऊफ हा गुरूवायूरचा राहणारा असून बीसीएच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. त्याला चार भाऊ असून सॉफ्टवेअरमध्ये त्याला विशेष रूची आहे.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result