ञिपूरा विधान सभेत बीजेपी जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले की,या विजयासाठी आरएसएस व कार्यककर्त्यांनी खूप पिडा भोगली, आणि ठिंणगी पडली. लेनिनचा पुतळा पाडला. हिंसा, घरेजाळपोळ, हल्ले सुरू झाले. चेन्नईत पेरियार यांचा पुतळा विद्रृप केला.
 मेरठ मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा फोडला. कोलकता येथे जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जीचा पुतळा प्रतिक्रिया देतानां विद्रृप केला. लेनिनचा पुतळा जनप्रक्षोभातून पाडला हे बीजेपीचे मत चूकीचे आहे. जनतेने बीजेपीला निवडून दिले ते सत्ताधारी पक्षाविरूध्द जनप्रक्षोभातूनच. तो मुद्दा संपला होता. आरएसएस व बीजेपी च्या कार्य कर्त्यांनी लेनिनचा पुतळा पाडला तो नरेंद्र मोदी यांच्या प्रतिक्रियेनंतर मग भडका उडाला.  आरएसएस व बीजेपीने हे ठरवून केले. आता देशभर वनवा पेटल्यानंतर नरेंद्र मोदी , अमित शहा, मगरीचे अश्रू ढाळत आहेत. हे त्यांचे सूडाचे व बदला घेण्याचे राजकारण आहे.ज्या ज्या महापुरूषांनी ब्राह्मणवादा विरूध्द वैचारिक संघर्षाची भूमिका घेतली त्यांच्या विरूध्द आरएसएसचे ब्राह्मण सत्ता आल्याने सूड उगवत आहे.जे ब्राह्मण डावे आहेत त्यांच्या विरूध्दही बदला घेण्याचे राजकारण करित आहेत. 
  पण आरएसएस आणि बीजेपीने याचे भान ठेवावे की, सत्ता गेल्यानंतर हाच पलटवार त्यांच्यावर होवू शकतो.
म. गांधी शांतीदूत म्हणून ओळखले जातात.त्यांची हत्त्या ब्राह्यण नथूराम गोडसे यांनी केली होती तेंव्हा ब्राह्मण लोकांना मारहाण झाली होती, घरे जाळली होती.हा इतिहास आहे.पण ब्राह्मणवादा विरूध्द वैचारिक संघर्षाची भूमिका घेतलेल्या महापुरूषांनी ब्राह्मणा विरूध्द हिंसा कधीच केली नाही.
      आरएसएस व बीजेपीला स्वत्ःचे आंतरराष्ट्रीय धोरण नाही.सरकार अमेरिकेच्या बाजूने जात आहे. लेनिनचा पुतळा भारतात पाडला हे रशियाला पटणार नाही. बीजेपी ब आरएसएस लेनिनला विदेशी म्हणत असले तरी भारतीय महापुरूषांचे पुतळे जगभर आहेत.त्यांनी भारतासारखीच भूमिका घेतलीतर काय होईल, हे उन्मादी बीजेपी व आरएसएस ला कळेल काय? 
सत्तेत आलेली बीजेपी व आरएसएस पुतळे पाडणे,फोडणे, विद्रृप करण्याचे सूडाचे व बदला घेण्याचे राजकारण करित आहे,गुंडगिरी करित आहेत. हे राजकारण देशासाठी अत्यंत धोकादायक प्रवृतीचे आहे. ते त्यांनी तातडीने थांबवावे."
असे मत ऍड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result