भगवान पगारे
       नाशिक
८ मार्च महिला दिना निमित्त....
          प्रेरणादायी यश संपादन करणारी गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी  जेव्हा गरिबीवर मात करीत वयाच्या २७ व्या वर्षी न्यायाधीश बनते....!
      "आई वडिलांचा इंग्रजी शिक्षणाचा आग्रह वडील सुरुवातीला खाजगी कंपनीत कामाला परंतु अचानक कंपनी बंद झाल्याने कुटुंबाला उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही अश्या स्थितीत वडिलांनी वकील व्यावसायिकांचे सहाय्यक म्हणून कामकाज बघत पत्नी २ मुली, १ मुलगा यांचा प्रपंच..! तुटपुंज्या कमाईत होणारी आर्थिक परवड त्यामुळे शालेय जीवनात 'ओपन हाऊस डे' ला कायम उपस्थित न राहता येत असल्याबद्दलची खंत...शाळेचा फी साठीचा तगादा परंतु.....उसनवारी व कर्ज रूपाने पैसा उभा करत.... कधी के. एन. केला शाळेच्या प्राचार्या चैताली बिस्वास आणि बोकील व विश्वस्थ   यांचा हातभार आणि सहकार्यामुळे पूर्ण केलेलं शिक्षण...फी अभावी बुडालेली शाळा...!
           आजतागायत भाड्याचे असलेलं घर थकीत भाड्यामुळे घरमालकाकडून असणारा तगादा... कधी रस्त्यावर फेकलेली भांडी व त्यातून होत असलेला अपमान मनस्ताप.... कधी कधी तर संपलेल्या गॅस सिलेंडरमुळे भाड्याच्या घराच्या गच्चीवर लाकडे आणून पेटवलेली चूल आणि त्यातून भागवलेली टिचभर पोटाची खळगी...  भावंडांची शिक्षणं...एल.एल.एम. कॉलेजची महागडी परंतु न परवडणारी फी भरणारे राजे शाहू समान दातृत्वहृदयी ऍड. पंकज पाटील प्रॅक्टिससाठीही वकील व्यवसायसाठी कोट घेऊन देणारे ऍड. जितेंद्र शिंदे... वकील झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे व्यवसायाचे अनुभव व राष्ट्रीय पातळीवरील 'जॅग'च्या कोर्ट मार्शल संबंधी न्यायिक परिक्षेपर्यंत घेतलेली झेप......!          
           महाराष्ट्रात न्यायाधीशांच्या परीक्षेत १३ व्या क्रमांकाने गुणवत्ता यादीत स्थान पटकावत न्याय व्यवस्थेत आरक्षण नसताना खुल्या स्पर्धेतील मिळवलेलं आकाशाला गवसणी घालणारं उत्तुंग यश..! आणि या प्रवासात मदत करणाऱ्या लोकांचे विशेष ऋण व्यक्त करत संघर्ष काळाचे वर्णन करताना जीवापाड जीव लावणारी आईचं आकस्मित जाणं....  मुग्धाने... संयम, जिद्द, मेहनत स्व-विश्वास व परिस्थितीनुरुप जगण्याचं, लढण्याचं, शिक्षणाचं मिळालेलं बळ..!
            यामुळे मी इथपर्यंत पोहचल्याचं सांगितलंय...!
      परिस्थिशी लढणाऱ्या अनेकांना बळ देणारा आणि प्रेरणादाई ठरणारा मुग्धाचा खडतर प्रवास होय......!
न्या. मुग्धा गांगुर्डे, नाशिक 

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result